मुंबई- राज्यात शनिवारी आणखी २८ कोरोना (कोविड-१९) रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८१ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक २२ रुग्ण मुंबईचे आहेत तर २ रुग्ण नागपूर येथील आहेत. पालघर - वसई विरार आणि नवी मुंबई परिसरातील चार रुग्ण आहेत. सध्या बाधित आढळलेल्या आणि रुग्णालयात भरती असलेल्या १०४ रुग्णांना कोरोना आजाराचे कोणतेही लक्षण नाही तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
राज्यात आज एकूण ३२३ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३८१६ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३३९१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत २६ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १७,२९५ व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून ५९२८ जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशीलजिल्हा/मनपा बाधित रुग्णमुंबई ७३सांगली २४पुणे मनपा १९पिंपरी चिंचवड १२नागपूर ११कल्याण-डोबिवली ७नवी मुंबई ६ठाणे ५यवतमाळ, वसई विरार प्रत्येकी ४अहमदनगर ३सातारा, पनवेल प्रत्येकी २उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया प्रत्येकी १इतर राज्ये - गुजरात १एकूण १८१