मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई पोलिसांकड़ून याबाबत नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याबाबत सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी पोलिसांवर हात उचलले जात आहे, तर कुठे गर्दी पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांचा प्रतिकार करत आहेत. काही मंडळी थेट पोलिसांच्या अंगावर धावून जात आहेत, बंदोबस्तावरील पोलिसांची थट्टा करत आहेत. या घटनांमुळे पोलिसांचे मनोधैर्य खचू शकते हे लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.कोरोनावर अद्याप औषध न मिळाल्याने आता आपला देवच आपल्याला वाचवू शकेल. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा, देवाचा धावा करा, अशा सूचना धर्मगुरूच देत असल्याने प्रार्थनेसाठी संबंधित समाजबांधव मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. गर्दीमुळे कोरोना विषाणू वाढू शकतो. याबाबत नागरिकांना समजावताच पोलिसांना प्रतिकार करण्यात येत आहे. शिवाय, काही जण पोलिसांच्या अंगावर धावून जात आहेत, तर काही जण बंदोबस्तावरील पोलिसांची थट्टा करत आहेत. यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचू शकते हे लक्षात घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बुधवारी अशाच पद्धतीने रस्त्यावर विनाकारण गर्दी करत असलेल्यांना घरी जाण्यास सांगत असताना पोलिसांनाच मारहाण करण्यात आली. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम आगावणे यांनी दिली आहे.
CoronaVirus in Mumbai : कोरोनाबाबत मार्गदर्शन करताना पोलिसांची थट्टा, मारहाणीचे प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:06 AM