Coronavirus: ट्विटरवरून मुंबई पोलिसांची ' सेफ्टी ट्युन'; फॉलोअर्स टप्पा ५० लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:44 AM2020-05-08T02:44:59+5:302020-05-08T02:45:20+5:30

हृदयाला भिडणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडीओ

Coronavirus: Mumbai Police's 'Safety Tune' on Twitter; Followers stage over 50 lakhs | Coronavirus: ट्विटरवरून मुंबई पोलिसांची ' सेफ्टी ट्युन'; फॉलोअर्स टप्पा ५० लाखांवर

Coronavirus: ट्विटरवरून मुंबई पोलिसांची ' सेफ्टी ट्युन'; फॉलोअर्स टप्पा ५० लाखांवर

Next

मुंबई : मुंबई पोलिसांच्याट्विटर अकाउंटवर हृदयाला भिडणाºया वेगवेगळ्या व्हिडीओ, संदेशानंतर पोलिसांनी नामांकित रॉक बँडचे मेम्स तयार करत त्याला 'सेफ्टी ट्युन' असे संबोधले आहे. ट्विटरवरील क्विक रिस्पॉन्समुळे पोलिसांच्या फ़ॉलोअर्सचा टप्पाही ५० लाखांवर पोहोचला आहे. लॉकडाउनच्या काळातही कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत नागरिक घराबाहेर पडत आहेत. आतापर्यंत मुंबईत ११ हजार १११ जणांविरुध्द १८८ कलमाअंतर्गत ५ हजार ९२० गुन्हे दाखल आहेत. यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ३ हजार ८५२ गुन्हे नोंद आहेत. तर अवैध वाहतुकीच्या ८६४ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.     

त्यात मुंबईतला कोरोनाबाधित रुग्णांचा दिवसेदिवस वाढणारा आकडा चिंंता वाढविणारा आहे. मुंबईत कडेकोट बंदोबस्ताबरोबरच नागरिक ट्विटरवरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहेत. यापूर्वी विविध व्हिडीओमार्फत त्यांनी मुंबईकरांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या. यातच गुरुवारी त्यांनी लोकप्रिय रॉक बँडच्या मेम्सद्वारे मुंबईकरांना घरी राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.       

यात 'घरीच थांबा.. आम्ही वाजवत आहोत... धून ए बंदोबस्त... बाहेर रस्त्यावर आपल्या सुरक्षेसाठी लॉकडाउनच्या काळात' असे म्हटले आहे. तसेच त्यांच्या हटक्या मेम्सचे कौतुक होत आहे. मुंबईकरांनो  शांत राहा.. घरी राहा...  कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावात अफवांमुळे नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. याबाबतच मुंबईकरांना आवाहन करताना पोलिसांनी ट्विटद्वारे सांगितले की, 'सध्या तुमच्याकडे खूप वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करा. अफवा पसरवू नका आणि त्यावर विश्वासही ठेवू नका. सध्या अतिरिक्त साठा करण्याचीही आवश्यकता नाही, तुम्ही फक्त शांत राहा आणि घरीच राहा. कोरोनाविरुद्धच्या लढाईत तेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.  

‘तुम्ही फक्त घरीच राहा‘
नागरिकांमध्ये कोरोनामुळे तणावाचे वातावरण आहे. याबाबत मुंबईकरांना आवाहन करताना पोलिसांनी सांगितले की, 'सध्या तुमच्याकडे खूप वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करा. अफवा पसरवू नका आणि त्यावर विश्वासही ठेवू नका. तुम्ही फक्त शांत राहा आणि घरीच राहा.

Web Title: Coronavirus: Mumbai Police's 'Safety Tune' on Twitter; Followers stage over 50 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.