Join us

CoronaVirus मुंबई, पुणेकरांना परवानगी नाहीच! जिल्हांतर्गत प्रवासाला पोलिसांकडून नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 20:58 IST

coronaVirus in Mumbai, Thane, Pune परराज्यात जाणाऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे. त्यांच्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

मुंबई : पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर )  आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची  परवानगी देण्याचे अधिकार  संबंधित विभागाच्या पोलिस उपायुक्तांना आहेत. मात्र,  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या  जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.

  मात्र, या दोन्ही  प्राधिकरण क्षेत्रातून  महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे. अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलिस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. 

अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड १९ प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून  पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कृपया अर्धवट किंवा अनधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आलेले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज एकूण ७९० रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १२ हजार  २९६ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज धारावी या मोठ्या झोपडपट्टीमध्ये ३८ रुग्ण सापडले आहेत. तर राज्यभरात एकूण १२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. धारावीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. देशासोबतच राज्यातही लॉकडाऊन १७ मे पर्यंत राहणार आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह महत्वाचे जिल्हे रेड झोन घोषित करण्यात आले आहेत. कोरोनाममुळे ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी मुंबईत २७, पुण्यामध्ये ३, अमरावती २, वसई विरार १, अमरावती १ आणि औरंगाबाद मनपा हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या एका नागरिकाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच; आज ३६ जणांचा मृत्यू

CoronaVirus दिलासादायक! गेल्या दोन दिवसांत धारावीत एकही मृत्यू नाही; पण...

CoronaVirus ठाणे जिल्ह्यात कहर! आज 97 नवे कोरोनाचे रुग्ण सापडले; एकूण रुग्णसंख्या 1109

जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम

IFSC केंद्र नेमके आहे तरी काय? गिफ्ट सिटीचा मालक कोण? जाणून घ्या...

तबलिगींच्या दानाचे केले गुणगाण; 'त्या' आयएएस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई पोलीसपोलिसकोरोना वायरस बातम्या