coronavirus: मुंबई सावरतेय! दिवसभरात ७८५ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 06:49 AM2020-07-08T06:49:16+5:302020-07-08T06:49:35+5:30
शहर-उपनगरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ५०९ झाली आहे, तर मृत्यू ५ हजार २ झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील ५८ हजार १३७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
मुंबई : मागील ३-४ महिने गतीने वाढणारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. कोरोनाच्या विळख्यातून मुंबई सावरत असून मंगळवारी दैनंदिन रुग्ण निदानात मोठी घट झाली आहे. दिवसभरात केवळ ७८५ रुग्णांची नोंद झाली, तर ६४ जणांचा मृत्यू झाला.
शहर-उपनगरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ५०९ झाली आहे, तर मृत्यू ५ हजार २ झाले आहेत. आतापर्यंत मुंबईतील ५८ हजार १३७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.
धारावीत केवळ एकाच रुग्णाचे निदान
23,359 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, आता शहर-उपनगरातील रुग्णदुपटीचा दर ४४ दिवसांवर गेला आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ६७ टक्क्यांवर आला आहे.
धारावीत मंगळवारी केवळ एकाच रुग्णाचे निदान झाले. सध्या येथे २ हजार ३३५ कोरोना रुग्ण असून ३५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
तर १ हजार ७३५ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. मागील तीन महिन्यांत पहिल्यांदाच धारावीच्या झोपडपट्टीच्या वस्तीत केवळ एका रुग्णाचे निदान झाले आहे.कमी वेळात चाचणी, शोध व उपचार या त्रिसूत्रींच्या माध्यमातून धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले.