CoronaVirus in Mumbai : चिंताजनक! प्रभादेवीच्या महिलेसह एका तरुणास कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:31 PM2020-03-26T13:31:15+5:302020-03-26T13:34:19+5:30

CoronaVirus in Mumbai : दक्षिण मुंबईत चिंताजनक वातावरण आहे.

CoronaVirus in Mumbai: Shocking! Corona infection in a young man with woman in prabhadevi pda | CoronaVirus in Mumbai : चिंताजनक! प्रभादेवीच्या महिलेसह एका तरुणास कोरोनाची लागण

CoronaVirus in Mumbai : चिंताजनक! प्रभादेवीच्या महिलेसह एका तरुणास कोरोनाची लागण

Next
ठळक मुद्देयाच परिसरात राहणारा आणि घाटकोपर परिसरात तंबाखू विकणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, मात्र आता टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.कलिना येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा करोना टेस्टचा रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता.

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. आज कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या 126 इतकी झाली आहे. त्यातच मुंबईच्या प्रभादेवी परिसरात एका महिलेचा कोरोनाचा टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत चिंताजनक वातावरण आहे. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना टेस्ट करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल येणं अद्याप बाकी असल्याचं जी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी सांगितलं.

तसेच या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच याच परिसरात राहणारा आणि घाटकोपर परिसरात तंबाखू विकणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, मात्र आता टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

 कलिना येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा करोना टेस्टचा रिपोर्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आला होता. इटलीमध्ये तो वेटरचे काम करत होता. विमानतळावरील स्क्रिनिंगमध्ये तो पास झाला आणि कस्तुरबा रुग्णालयातील त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट आता निगेटीव्ह आला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

 

कालिनातील या तरुणामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. नंतर त्याने स्थानिक डॉक्टरचा सल्ला घेतला आणि पुन्हा कस्तुरबामध्ये चाचणीसाठी गेला. तेथे त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला - ब्रायन मिरांडा, माजी नगरसेवक 

Web Title: CoronaVirus in Mumbai: Shocking! Corona infection in a young man with woman in prabhadevi pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.