Coronavirus Mumbai Updates : करून दाखवलं! मुंबईकरांना मोठा दिलासा; धारावीत तिसऱ्यांदा शून्य रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 09:33 PM2021-06-23T21:33:22+5:302021-06-23T21:36:20+5:30
Coronavirus Mumbai Updates : दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्यांदा धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई - धारावी परिसरात कोरोनाचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. बुधवारी या भागात पुन्हा एकही बाधित रुग्ण सापडलेला नाही. तसेच केवळ दहा सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेनंतर आता तिसऱ्यांदा धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी मध्यान्हपासून मुंबईत कोरोना पुन्हा वाढू लागला. धारावी समोर पुन्हा आव्हान उभे राहिले. यावेळेस चाळी, झोपडपट्ट्यामध्ये नव्हे तर इमारतींमध्ये रुग्ण वाढ अधिक होती. त्यामुळे पुन्हा धारावी पॅटर्न राबविण्यास सुरुवात झाली. जास्तीतजास्त लोकांची चाचणी, बाधितांचे संपर्कातील लोकांना शोधणे, तात्काळ विलगीकरण आणि त्वरित उपचार सुरू करण्यात आले. परिणामी, धारावी पुन्हा कोरोनामुक्त होण्याचा मार्गावर आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यात २२, २६, २७, ३१ जानेवारी आणि २ फेब्रुवारीत धारावीमध्ये शून्य रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेत धारावीने पुन्हा शून्य रुग्ण नोंद होण्याची हॅटट्रिक केली आहे.
आतापर्यंत रुग्ण संख्या
परिसर....एकूण....सक्रिय....डिस्चार्ज...आजची स्थिती
दादर....९६००....१३३.....९२८३.... ०४
धारावी....६८७५....१०....६५०६... ००
माहीम....९९४३....९३....९६४८.... ०४