Coronavirus Mumbai Updates : दोन डोस घेतलेल्या फक्त २६ लोकांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 10:10 PM2021-06-28T22:10:23+5:302021-06-28T22:11:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. आतापर्यंत सात लाख २० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

Coronavirus Mumbai Updates: Only 26 people infected with coronavirus after taking two doses | Coronavirus Mumbai Updates : दोन डोस घेतलेल्या फक्त २६ लोकांना कोरोनाची लागण

Coronavirus Mumbai Updates : दोन डोस घेतलेल्या फक्त २६ लोकांना कोरोनाची लागण

Next

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये कोविडला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे दोन डोस घेतलेल्यानंतरही कोरोना होणाऱ्या २६ रुग्णांचा समावेश आहे. तर पहिला डोस घेतलेल्या दहा हजार ५०० नागरिकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. 

मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. आतापर्यंत सात लाख २० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ९५ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. कोविड १९ ला प्रतिबंध करणारी लस देण्यास १६ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली. त्याच दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. या काळात बाधित रुग्णांची दररोजची संख्या थेट दहा हजारांवर पोहोचली होती. मात्र अनेक उपाययोजनानंतर कोरोनाचा प्रसार आता मुंबईत नियंत्रणात आला आहे. तरीही मुंबईकरांनी कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे आणि वारंवार हात धुवावे असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

- मुंबईत सध्या पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालये अशा ३९० ठिकाणी लसीकरण सुरू आहे. या ठिकाणी एका दिवसांत दीड लाखांहून जास्त लसीकरण करण्याची क्षमता आहे. 

- २६ जून रोजी एकाच दिवसात मुंबईत सर्वाधिक एक लाख ५४ हजार २२८ इतके डोस देण्यात आले. त्यामुळे आगामी काळात जास्तीतजास्त लस मिळाल्यास लसीकरण वाढवण्यात येणार आहे. 

- मुंबईत आतापर्यंत ५० लाखांवर डोस देण्यात आले असून १० लाखांवर नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

- १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी काही कंपन्यांनी आयसीएमआरला परवानगीसाठी पत्र दिले आहे. ही परवानगी मिळाल्यास लहान मुलांच्या लसीकणाचाही मार्ग मोकळा होणार आहे. 

Web Title: Coronavirus Mumbai Updates: Only 26 people infected with coronavirus after taking two doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.