Join us

Coronavirus : मुंबईकरांनो, गर्दी करून जीव धोक्यात घालू नका, उद्घोषणेद्वारे पोलिसांची जनजागृती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 3:01 AM

जुहू बीच बंद ठेवण्याचा निर्देश सरकारने दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जुहू आणि सांताक्रुझ पोलिसांनी कंबर कसली आहे.

मुंबई : ‘समुद्र किनारी गर्दी करून स्वत:च्या जिवाशी खेळू नका, जीव धोक्यात घालू नका,’ अशी उद्घोषणा जुहू समुद्र किनाऱ्यावर पोलिसांकडून करण्यात येत आहे. जुहू बीच बंद ठेवण्याचा निर्देश सरकारने दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जुहू आणि सांताक्रुझ पोलिसांनी कंबर कसली आहे.कोरोना व्हायरस रोखण्याच्या उद्देशाने सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे जुहू बीच बंद ठेवणे हाही आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा देण्यात आलेले अनेक नागरिक मौजेसाठी जुहू बीचवर गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अखेर जुहू किनारा बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सोमवारी रात्रीपासूनच जुहू आणि सांताक्रुझ पोलिसांकडून बीचच्या दिशेने येणाºया सर्व प्रमुख मार्गांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी केल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होण्याची भीती आहे, त्यामुळे मुंबईकरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांकडून उद्घोषणेद्वारे करण्यात येत आहे, तसेच हे निर्देश मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे.बीच परिसरात जुहू आणि सांताक्रुझ पोलिसांची चार गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत. सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील ४० तर जुहू पोलीस ठाण्यातील २५ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी या ठिकाणी बंदोबस्त ठेवल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.पोलिसांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहनजगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूचा प्रभाव हा तिसºया आणि चौथ्या आठवड्यात वाढीस लागतो. ही बाब अन्य देशांतील रुग्णांची वाढलेली संख्या पाहता उघड झाली आहे. त्यानुसार, नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे.‘नागरिकांकडूनही मिळत आहे सहकार्य’‘आम्ही नागरिकांना समजावून सांगत असून, त्यांच्याकडूनही आम्हाला योग्य ते सहकार्य मिळत असल्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ वाव्हळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बॅनरमार्फतही आम्ही लोकांमध्ये जनजागृती करत असून, बीच परिसर पूर्णपणे रिकामा झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस