Join us

Coronavirus : मुंबईकरांनो, स्वच्छ राहा.. स्वस्थ राहा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 3:41 AM

कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर मुंबईत स्वच्छतेची मोहीम ही तीव्र करण्यात आली आहे.

मुंबई : देशभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे मुंबईकरही धास्तावले आहेत. बºयाच लोकांनी घरातूनच काम करण्यास सुरुवात केली आहे. तर अनेक जण स्वसंरक्षणासाठी तोंडाला मास्क लावून घराबाहेर पडत आहेत. मात्र या आजारापासून आपला बचाव करण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता राखण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर मुंबईत स्वच्छतेची मोहीम ही तीव्र करण्यात आली आहे.मुंबईत कोरोनाची लागण झालेले आठ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. यामुळे मुंबईत सर्वत्र भीतीचे वातावरण असल्याने महापालिकेमार्फत जनजागृती केली जात आहे. तसेच स्वच्छतेवरही भर देण्यात आला आहे. प्रत्येक विभागातील कचरा वेळेत उचलला जाईल, याची खबरदारी घेतली जात आहे. तसेच पालिका रुग्णालये, विभाग कार्यालये स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. पालिकेतील सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मास्क, हातमोजे वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच पालिका कार्यालयांमधील बायोमेट्रिक यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे.जलतरण तलाव, मैदाने, उद्याने आणि भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय अशी गर्दी होणारे सार्वजनिक परिसर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. माहिम विभागात परदेशातून येणाºया नागरिकांची संख्या अधिक असल्याने जी उत्तर विभाग कार्यालयामध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. मास्क आणि हातमोजे घालून सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वारावर तैनात करण्यात आले आहे. तसेच कार्यालयात येणाºयांसाठी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. पालिका मुख्यालयात दररोज हजारो नागरिक येत असल्याने येणाºया प्रत्येकाचे स्कॅनिंग करण्यात येत आहे.ही काळजी घ्यावी...आपल्या हातावर जवळपास दहा मिनिटे विषाणू राहतो. त्यामुळे वेळोवेळी हात साबणाने धुवावेत.कपड्यांवर पडणारा विषाणू साधारण नऊ तासांपर्यंत सक्रिय राहतो. त्यामुळे रोज धुतलेले कपडे घालावे व सूर्यकिरणांमध्ये उभे राहावे.सॅनिटायझरने हात स्वच्छ ठेवणे आणि गरम पाणी पीत राहणे.सर्दी असल्यास नाकावर रुमाल धरणे. तर सतत शिंका येत असल्यास प्रत्येक सहा तासांनी रुमाल बदलणे.वैयक्तिक स्वच्छता राखणे, घर-परिसर स्वच्छ ठेवणे.शक्य असल्यास घरातून काम करणे.काय टाळाल...परदेशी प्रवास अथवा परदेशातून आलेल्या व्यक्तीशी संपर्क टाळणे.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे.सर्दी, खोकला, शिंका येत असल्यास वेळ न दवडता डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे.श्वसनाचा त्रास असलेल्या लोकांजवळ जाणे टाळावे.कच्चे आणि अर्धवट शिजलेले अन्न खाऊ नये.कोरोनाची लागण झालेले सर्व रुग्ण परदेशातून आले असल्याचे दिसून आले आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झाल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र दक्ष राहणे आणि वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. सर्दी, पडसे असल्यास नाकावर रुमाल ठेवला तरी पुरेसे आहे.- सुरेश काकाणी (अतिरिक्त आयुक्त,मुंबई महापालिका)वकिलांचेही ‘गो कोरोना गो’बोरीवली न्यायालयातील वकिलांनी कोरोना व्हायरसचे संकट देशातून निघून जाण्यासाठी सोमवारी ‘गो कोरोना गो’ असा नारा दिला. या वेळी न्यायालयातील सर्व वकील आणि बार कौन्सिलच्या सदस्यांना मास्कचे वाटपही करण्यात आले. जीवघेण्या कोरोना व्हायरसचे संकट लवकरात लवकर हद्दपार होण्याची प्रार्थना या वेळी करण्यात आली, अशी माहिती बोरीवली बार कौन्सिलचे अध्यक्ष राजेशराव मोरे यांनी दिली. महिला वकिलांसाठी तयार करण्यात आलेल्या नवीन बार रूमचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले. या कार्यक्रमात मास्कचे वाटप करण्यात आले.या हेल्पलाइनवर होतील शंका दूर...१९१६ या हेल्पलाइनवर लोकांनी संपर्क केल्यास त्यांना सर्व माहिती व त्यांची शंका दूर करण्यासाठी २४ तास डॉक्टर कार्यरत आहेत. आजाराची लक्षणे, कोणती काळजी घ्यावी याबाबत सर्व माहिती डॉक्टर या हेल्पलाइनवरून नागरिकांना देत आहेत.हात केव्हा धुवावेत?जेवणापूर्वी/जेवण बनवण्यापूर्वी आणि बनवून झाल्यानंतरमुलांना भरवण्यापूर्वी, अगदी स्तनपान देण्यापूर्वीहीशौचास जाऊन आल्यावरडायपर बदलल्यानंतर आणि मुलांना टॉयलेटला नेऊन आणल्यानंतरनाक शिंकरल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतररोग्याला भेटायला जाण्यापूर्वी आणि त्याला भेटून आल्यानंतरदुसºयांनी वापरलेल्या खेळण्यांशी खेळल्यानंतरप्राण्यांना हाताळल्यानंतर तसेच त्यांची विष्ठा काढल्यानंतरबोरीवली न्यायालयात मास्कचे वाटपन्यायालयात दर दिवशी शंभर ते दीडशे लोक रोज येतात. आम्ही आमच्या अशिलांना भेटतो तेव्हा नकळतपणे हात मिळवणे, लोकांशी चर्चा करणे होत असते. कोरोना हा माणसाकडून माणसामध्ये पसरणारा आजार असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे योग्य ती काळजी घेत यापासून स्वत:चा बचाव करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही मास्कचे वाटप केल्याचे मोरे यांनी सांगितले.

तीस सेकंद चोळून सतत हात धुवा; तज्ज्ञांचा सल्लामुंबई : कोरोना या आजाराबाबत बरेचसे समज आणि गैरसमज पसरले आहेत. अनेक शहरांमध्ये हा आजार पसरलेला आहे. कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून बचाव करायचा असला तर वैयक्तिक व परिसर स्वच्छतेची अधिक निकड आहे. मात्र ९० टक्के लोकांना हात नेमके कसे स्वच्छ धुवायचे हे माहीतही नाही. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता पाळल्यास कोरोनाचा संसर्ग शिवाय अन्य आजारांपासून सर्वसामान्यांचा बचाव होईल, अशी माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.याविषयी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले, कमीत कमी २०-३० सेकंदांपर्यंत हात धुतले पाहिजेत. सहा टप्प्यांमध्ये हात स्वच्छ धुवायचे आहेत. सगळ्यात आधी हात ओले करा, हातात साबण घ्या आणि हात चोळून फेस काढा. पूर्ण हात स्वच्छपणे साफ करून घ्या. नखे आणि तळहातदेखील स्वच्छ करा. त्यामुळे, प्रत्यक्षात हातावरून जे काही विषाणू आहेत ते मरून जातात. हात धुतल्यानंतर ते स्वच्छ पुसले पाहिजेत. डोळे, नाक आणि तोंड या भागांना हात न लावणे गरजेचे आहे. या विषाणूला दूर ठेवायचे असेल तर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे आणि आरोग्य चांगले ठेवणे फारच गरजेचे आहे. तर पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, तोंड, नाक, डोळे आणि कान यांच्यामार्फत आपल्याला संसर्ग होतो. म्हणून चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळले पाहिजे. शिंकताना किंवा खोकताना तोंड झाका आणि मग हात इतर कुठेही लागू देऊ नका. शिंकताना किंवा खोकताना हाताचा वापर केल्यास लगेच हात धुणे महत्त्वाचे आहे. टिश्यूपेपर वापरणे कधीही चांगले. कारण तो एकदा वापरल्यानंतर आपण तो फेकून देतो.थुंकणाऱ्यांविरोधात रेल्वेची मोहीममुंबई : कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रेल्वे स्थानक परिसरात कचरा फेकणाºया आणि थुंकणाºयांविरोधात मध्य रेल्वेने विशेष कारवाई मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत१ ते १० मार्चदरम्यान १३८ जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १३,९०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात १४० जणांवर कारवाई करण्यात आली होती. त्यांच्याकडून २४,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता.‘हात’ निरोगी राहण्याची गुरुकिल्लीआपल्या अस्वच्छ हातांमध्ये इतके जीवाणू आणि विषाणू असतात, जे आपल्याला सुदृढ राहण्यासाठी मदत करतात किंवा आजारी पाडतात. त्यामुळे केवळ वीस सेकंद साबण /लिक्विड हॅण्ड वॉशने हात धुतल्यास जंतू मरतात. निरोगी राहण्याची गुरुकिल्ली ही आपल्या ‘हाता’तच आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई