Join us

coronavirus : नारायण राणे यांनी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी दिले 1 कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 3:39 PM

कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यासाठी आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशासमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यासाठी आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे.माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच नारायण राणे मुंबई आणि आसपासच्या उपनगरात राहणाऱ्या कोकणी माणसांची जबाबदारी उचलली आहे. तसेच त्यांच्यामार्फत कोकणी माणसांना मदत देण्यात येत आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत मुंबईत राहणारे अनेक जण गावी जाण्यास इच्छूक आहेत. मात्र त्यांनी गावी न जाता मुंबईतच राहावे असे आवाहन राणे यांनी केले आहे. 'सरकारने प्रवासाला बंदी घातल्यामुळे कोकणात पाठवणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही जिथे आहात तिथे थांबणे हे तुमच्या आणि सर्वांच्या दृष्टीने हिताचे असल्याचे सांगत नारायण राणे यांनी तुम्हाला जी काही मदत लागेल ती सर्वतोपरी केली जाईल. फक्त तुम्ही घरात थांबा, असे आवाहन राणे यांनी मुंबईकर कोकणवासीयांना केले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसनारायण राणे कोकण