मुंबई – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना यामध्ये आतापर्यंत ७० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं आहे. कोरोनाच्या अंधकारापासून लोकांना प्रकाशित करण्यासाठी घरोघरी दिवे लावा असं आवाहन त्यांनी केलं त्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. ट्विट करुन त्यांनी म्हटलंय की, सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी घोर निराशा केली आहे. ‘सोचा था चूल्हा जलाने की बात हो गी साहब दिया जलाने का उपदेश दे गए’ अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. यापूर्वीही नरेंद्र मोदींच्या टाळी आणि थाळी नादावर विरोधकांनी टीका केली होती.
त्याचसोबत देशात २२ मार्चला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. रात्री उशीरा ८ वाजता पंतप्रधानांनी देशाला संबोधित करत मध्यरात्रीपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याची घोषणा केली मात्र लॉकडाऊन म्हणजे नोटाबंदी नव्हे असं सांगत मंत्री जयंत पाटील यांनी मोदींच्या धोरणावर टीका केली होती. लॉकडाऊन सकाळी जाहीर केले असते तर लोकांना त्रास झाला नसता असं मत त्यांनी मांडले.
लॉकडाऊनमुळे देशातील मजुरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. शेकडो कामगार गावच्या दिशेने पायपीट करु लागले. रस्त्यावर कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने मुलाबाळांसह सर्व कुटुंब रस्त्यावरुन चालताना दिसले. नियोजन न करता मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली त्यामुळे हजारो मजुरांवर रस्त्यावर राहण्याची वेळ आली असं विरोधकांनी सुनावलं होतं. त्यानंतर आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी या लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा करतील अशी आशा विरोधकांना लागली होती पण तसं काही न झाल्याने विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
शुक्रवारी सकाळी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना सांगितले की, कोरोनाच्या संकटाविरुद्ध लढाईला प्रकाशित करत हे तेज आपल्या चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता मला तुमच्या सर्वांची ९ मिनिटं हवी आहेत. घरातील सर्व लाईट्स बंद करा, दरवाजे आणि बालकनीत उभं राहून दिवा, मेणबत्ती, टॉर्च अथवा मोबाईलची फ्लॅश लाईट सुरु करा. प्रकाशाच्या महाशक्तीमुळे आपण या युद्धाशी लढतोय आपण एकटे नाही तर १३० कोटी जनता एकाच संकल्पतेने लढतोय हे कळेल असं नरेंद्र मोदींनी आवाहन केले.
महत्त्वाच्या बातम्या
तिमिरातुनी तेजाकडे... ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरोघरी दिवा लावू या: पंतप्रधान
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीनची अनोखी शक्कल; पटकन् बरे झाले हजारो रुग्ण!
Coronavirus: देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ; फक्त ४ दिवसात आढळले ‘एवढे’ रुग्ण
Coronavirus: 'तबलिगी जमातचे 'ते' लोक नर्सेस समोरच बदलतात कपडे, करतात अश्लील कृत्ये'
Coronavirus: कोरोनामुळे राज्यात २१ जणांचा बळी; ८८ नवीन रुग्णांची नोंद, ४२ रुग्णांना सोडले घरी