coronavirus: नेस्को प्रदर्शन केंद्र बनले दर्जेदार कोविड आरोग्य केंद्र, ७५५ रुग्ण झाले कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 03:12 AM2020-07-07T03:12:27+5:302020-07-07T03:12:50+5:30
या ठिकाणी आतापर्यंत दाखल झालेल्या १२६१ कोरोना रुग्णांपैकी ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजमितीस येथे सुमारे ४00 कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलिमा आंद्राडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईत विविध देशी व विदेशी उद्योग, आस्थापनांची प्रदर्शने ही सातत्याने पश्चिम दु्रतगती महामार्गासमोर असलेल्या नेस्को प्रदर्शन केंद्रात भरत असत. मात्र या जागेचा उपयोग मुंबई महापालिकेने उत्तम प्रकारे करून येथे एक दर्जेदार कोविड आरोग्य केंद्र उभारले आहे. या ठिकाणी आतापर्यंत दाखल झालेल्या १२६१ कोरोना रुग्णांपैकी ७५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजमितीस येथे सुमारे ४00 कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलिमा आंद्राडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
या ठिकाणी रु ग्णक्षमता ही ११७१ बेड असून ६६ बेड हे संशयित कोरोना रुग्णांसाठी राखीव असतात. कोरोना रुग्ण याठिकाणी आमच्या केंद्राशी रुग्ण थेट संपर्क साधतात, तसेच येथे मुंबईतील पालिकेच्या वॉर्डमधून तसेच आपतकालीन कक्षातून येथे उपचारासाठी येतात अशी माहिती त्यांनी दिली.
येथे रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. तसेच त्यांना एक किट देण्यात येते, ज्यात टूथपेस्ट, ब्रश, साबण, सॅनिटायझर आणि अन्य बाबींचा समावेश असतो. याठिकाणी कोविड रुग्णांच्या देखभालीसाठी तीन पाळ््यात ६२ डॉक्टर, ८७ परिचारीका आणि १0७ वॉर्ड बॉय कार्यरत आहेत. प्रत्येक कोविड रु ग्ण लवकर कसा चांगल्याप्रकारे कोरोनामुक्त होईल याकडे आम्ही सर्व जातीने लक्ष देतो, असे डॉ. निलीमा आंद्राडे यांनी सांगितले.
या केंद्राच्या आत पीपीई किट घातलेले ४ डॉक्टर असतात तर २ डॉक्टर हे अॅडमिशन बूथवर, तर २ डॉक्टर स्मार्ट ओपीडीत असतात. डेटा एन्ट्री आॅपरेटही असतो. येथील स्मार्ट ओपीडीत कोविड सेंटरच्या काचेच्या पलिकडे असलेले डॉक्टर हे एकीकडे रुग्णांकडे आणि त्यांच्या औषधोपचाराकडे लक्ष देत असतांना, दुसरीकडे या केंद्रापासून २00 मीटर अंतराववर असलेल्या नियंत्रण कक्ष व सीसी टीव्हीच्या माध्यमातून आमचे रु ग्णांकडे आणि त्याच्या आरोग्य स्थितीकडे जातीने लक्ष ठेऊन असतात.
रु ग्णांचा रक्तदाब, आॅक्सिजनचे प्रमाण किती आहे, त्याला कोणती औषधे दिली आहेत याची सर्व माहिती आमच्या नियंत्रण कक्षाला सतत मिळत असते. जेणेकरून रु ग्णांवर बारीक लक्ष ठेवणे आम्हाला शक्य होते. तसेच रुग्णांना काही अडचण असेल तर ते थेट त्याच्या बेडवरील फोनच्या माध्यमातून डॉक्टरांशी संपर्क साधतात, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच येथे रु ग्णांना सूचना देण्यासाठी मध्यवर्ती सूचना कक्षाच्या माध्यमातून सर्व रु ग्णांना जेवण आल्याची आणि अन्य एकित्रत सूचना आम्ही देतो असे त्यांनी सांगितले. रुग्णांसाठी आॅक्सिजन सिलेंडरची तसेच पोर्टेबल आॅक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे.
डायलिसिसच्या रुग्णांची विशेष देखभाल
रु ग्णाला डायलिसिसची गरज असेल तर त्यांना सोमवारी व गुरु वारी जवळच्या ट्रामा सेंटरमध्ये रु ग्णवाहिकेमधून पाठविण्यात येते व परत येथे आम्ही घेऊन येतो. जर एखाद्या रु ग्णाची अवस्था बिकट असेल तर त्याला सेव्हन हिल, कूपर व नायर या ठिकाणी अॅडमिट केले जाते. त्यासाठी रुग्णवाहिका तसेच बसही उपलब्ध असल्याचे डॉ. नीलिमा अंद्राडे यांनी सांगितले.