Join us

coronavirus: नवी दिल्ली-मुंबई सेंट्रलसाठी मंगळवारपासून रेल्वेसेवा होणार सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 10:44 PM

पहिल्या टप्यात दोन्ही दिशेकडे जाण्यासाठी ३० अशा एकुण १५ मेल-एक्सप्रेसच्या जोड्या सुरु करण्यात येणार आहेत. 

मुंबई :  लॉकडाऊनमुळे देशभरातील रेल्वे प्रवासी सेवा २३ मार्चपासून पूर्णपणे बंद होती. मात्र आता १२ मे पासून नवी दिल्लीहुन मुंबई सेंट्रल, डिब्रूगड, अगरतला, हावडा, पटना, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, तिरुअनंतपुरम, मडगाव, अहमदाबाद आणि जम्मू तवीला या दरम्यान विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वने  काही  प्रमुख निवडलेल्या मार्गावर प्रवासी रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात दोन्ही दिशेकडे जाण्यासाठी ३० अशा एकुण १५ मेल-एक्सप्रेसच्या जोड्या सुरु करण्यात येणार आहेत. 

देशातील प्रवासी या विशेष गाड्यांचे आरक्षण ११ मे रोजी दुपारी ४ वाजल्यापासुन आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर करु शकतात. कोरोनामुळे रेल्वे  स्थानकातील तिकिट बुकींग काउंटर बंद राहणार आहे. केवळ वैध कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क घालणे आणि स्क्रीनिंग करणे बंधनकारक असेल. केवळ वैद्यकीयदृष्ट्या सुरक्षित  असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये जाण्याची परवानगी असणार आहे. याशिवाय रेल्वेच्या पुढच्या टप्यातील गाड्यांचे वेळापत्रक नंतर जाहिर करण्यात येईल असे रेल्वे   मंत्रालयाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात सांंगितले आहे. 

दुसऱ्या टप्यात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी रेल्वेचे जे २० हजार डबे राखुन ठेवण्यात आले होते. ते पुन्हा रेल्वेकडे उपलब्ध झाल्यानंतर प्रवासी सेवा अधिक वाढविण्यात येणार आहेत. मजुरांच्या प्रवासासाठी चालविण्यात येणाºया 'श्रमिक विशेष ट्रेन'च्या संख्येत देखील वाढ करण्यात येणार आहे. त्यानुसार दिवसाला ३०० श्रमिक ट्रेन चालविण्याची रेल्वे  मंत्रालयाची योजना आहे. 

नवी दिल्ली-मुंबई सेंट्रल अशा गाड्या धावणार आहेत. मात्र या गाड्याच्या वेळेचे नियोजन करण्यात येत आले. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर वेळ ठरेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली.

१२ मे रोजी पासून नवी दिल्लीहुन ट्रेन सुटतील. यामध्ये मुंबई सेंट्रल येथे देखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या ट्रेनच्या वेळा अजून ठरल्या नाहीत. ११ मे रोजी ट्रेनच्या वेळेचे नियोजन होईल. पहिली ट्रेन नवी दिल्ली-मुंबई सेंट्रलसाठी धावेल, त्यानंतर हि ट्रेन मुंबई सेंट्रलवर धावेल. मात्र किती वाजता धावेल याचे नियोजन केले जात आहे,  अशी माहिती आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरावाला यांनी दिली. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतीय रेल्वेमुंबई