Join us

coronavirus: नव्या महापालिका आयुक्तांचे मिशन धारावी, नायर; बाधित क्षेत्रांतील रुग्णांची भेट, नागरिकांशी संवाद  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 4:57 AM

नवनियुक्त आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष नायर रुग्णालय आणि धारावी परिसरात जाऊन कोरोनाबाधित रुग्ण, बाधित क्षेत्रातील रहिवासी, पालिकेचे वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी संवाद साधला.

मुंबई : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना महापालिकेच्या नेतृत्वात तडकाफडकी बदल करण्यात आले. नवनियुक्त आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शनिवारी प्रत्यक्ष नायर रुग्णालय आणि धारावी परिसरात जाऊन कोरोनाबाधित रुग्ण, बाधित क्षेत्रातील रहिवासी, पालिकेचे वैद्यकीय कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. एवढेच नव्हे तर, कोणतीही अडचण आल्यास प्रशासनाशी थेट संपर्क साधण्याचा सल्लाही त्यांनी सर्वांना दिला. तसेच जास्तीत जास्त लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचे आदेश त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.आयुक्त चहल यांनी शुक्रवारी रात्री पालिका मुख्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला. त्यानंतर शनिवारी सकाळी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात रुग्णांची विचारपूस केली. या वेळी त्यांनी स्वसंरक्षण वेश परिधान केला होता. कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करताना त्यांच्या सूचनेची नोंदही आयुक्तांनी घेतली.राज्य सरकारच्या आदेशानुसार नायर रुग्णालय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत करण्यात आले आहे. याबाबतचे सादरीकरण नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी या वेळी केले. रूग्णांचे वर्गीकरण, होम क्वारंटाइनवरळी, प्रभादेवीपाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी परिसरात रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी धारावीत २५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता ८८८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २७ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे. या विभागाचा आढावा घेण्यासाठी आयक्त चहल यांनी मुकुंदनगर, शास्त्रीनगर परिसराची पाहणी केली. या वेळी सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली. धारावीत आढळणाºया रुग्णांचे वर्गीकरण करावे, शक्य असल्यास होम क्वारंटाइन करावे, असे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले.नायर रुग्णालयात सध्या ५३१ खाटा असून ५३ खाटा अतिदक्षता विभागात आहेत. तर ११० खाटा गर्भवती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी २२ दिवसांत ४४ गर्भवतींची प्रसूती सुखरूपणे पार पडल्याचे या वेळी सांगण्यात आले. चिंंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी वापरण्यात येत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जोशी यांनी या वेळी दिली.आरोग्य सेवेत त्रुटी नकोचनायर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर कोरोनाविरुद्ध लढ्यात काम करणाºया सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच उपचार, आरोग्य सेवा यामध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये, असेही त्यांनी बजावले. मात्र अडचणी असल्यास प्रशासनाशी संपर्क करू शकता, असे आयुक्तांनी सांगितले. रुग्णालयाकडून मिळणारे उपचार, प्रकृतीत झालेली सुधारणा, औषधे व अन्नपुरवठा यासंदर्भात रुग्णांकडून वस्तुस्थितीही त्यांनी जाणून घेतली.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई