CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील १ लाख ८२ हजार रुग्ण ‘कोविड’मुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 01:38 AM2020-07-22T01:38:26+5:302020-07-22T06:33:59+5:30
आतापर्यंत १ लाख ८१ हजार २१७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई : राज्यात मंगळवारी ८ हजार ३६९ रुग्णांची नोंद झाली, तर २४६ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या
३ लाख २७ हजार ३१ इतकी आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा १२ हजार २७६ वर पोहोचला आहे.
कोरोनाच्या संकटात दिलासादायक बाब म्हणजे कोविडमुक्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला सक्रिय रुग्णांचा आलेखही कमी होतानाचे चित्र आहे. मंगळवारी ७ हजार १८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत १ लाख ८१ हजार २१७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या १ लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.७२ टक्क्यांवर आले असून मृत्यूदर ३.७५ टक्के झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २४६ मृत्यूंमध्ये मुंबई ६२, ठाणे ३, ठाणे मनपा ३, नवी मुंबई मनपा ६, कल्याण डोंबिवली मनपा ३, उल्हासनगर मनपा ५, भिवंडी निजामपूर मनपा ३, मीरा-भार्इंदर मनपा ४, पालघर ५, रायगड ४, पनवेल मनपा २, नाशिक २, नाशिक मनपा ४ , मालेगाव मनपा १, अहमदनगर २, अहमदनगर मनपा १, धुळे १, जळगाव ४, जळगाव मनपा २, नंदूरबार २, पुणे १, पुणे मनपा ४०, पिंपरी-चिंचवड मनपा १५, सोलापूर ६, सोलापूर मनपा ४, सातारा ८, कोल्हापूर १, कोल्हापूर मनपा २, सांगली २, औरंगाबाद ५, औंरगाबाद मनपा १२, जालना १, बीड १, अमरावती १, यवतमाळ ३, नागपूर मनपा ३ आणि अन्य राज्य/ देश ३ आदी रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईत कोरोनाचे आणखी ६३ बळी
मुंबईत दिवसभरात ६३ मृत्यू झाले असून एकूण मृत्यू ५ हजार ८१७ झाले आहेत. सध्या २३ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६ लाख ४० हजार ६४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९.९३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.