मुंबई : राज्यात बुधवारी १०५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत १,८९७ जणांनी जीव गमावला आहे. दिवसभरात २,१९० नवीन रुग्णांसह एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५६ हजार ९४८ झाली आहे.
राज्यातील १०५ कोरोना मृत्यूमध्ये मुंबई ३२, ठाणे १६, जळगाव १०, पुणे ९, नवी मुंबई ७, रायगड ७, अकोला ६, औरंगाबाद ४, नाशिक ३, सोलापूर ३, सातारा २, अहमदनगर १, नागपूर १, नंदुरबार १, पनवेल १ तर वसई विरारमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज नोंद झालेल्या एकूण १०५ मृत्यूपैकी ७२ पुरुष तर ३३ महिला आहेत.
ब्राझील, रशियामध्येही कहर
कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या बुधवारी १ लाख १,४७० झाली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांत अमेरिकेत मृतांचा आकडा कमी होत आहे. जगभरात आतापर्यंत ३ लाख ४५ हजार लोक कोरोनामुळे मरण पावले आहेत. रशिया आणि ब्राझील या देशांत मात्र कोरोनाचा कहर वाढला असून, आता रुग्णांच्या संख्येमध्ये ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.
1,58,000 देशाची रुग्णसंख्या
भारतात कोरोनाचा हाहाकार कमी होण्याची चिन्हे नसून, या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५८ हजारांवर पोहोचली आहे.