मुंबई : कोरोनामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्या असून, जागतिक मंदीची भीती वर्तविली जात आहे. भारतामधील १५ क्षेत्रांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता डीएसपी इन्व्हेस्टर्स मॅनेजर्सच्या अहवालामध्ये वर्तविण्यात आली आहे. टेलिकॉम, फार्मा आणि कृषिक्षेत्राला याचा फारसा फटका बसणार नसल्याचा निष्कर्षही या अहवालामध्ये काढण्यात आला आहे.देशाच्या विविध भागांमध्ये कोरोनाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. या परिणामांचा अभ्यास करीत डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात विविध क्षेत्रांवर या संकटाचा होणारा परिणाम मांडण्यात आला आहे. या अहवालात मोठा, माफक आणि कमी परिणाम होणाऱ्या क्षेत्रांनुसार मांडणी करण्यात आली आहे. एनबीएफसी, बँकिंग, रिटेल, टेक्सटाइल, आयटी, रिअल इस्टेट, आॅटो आणि मेटल्स ही क्षेत्रे मोठ्या परिणामांच्या कक्षेत आहेत. टेलिकॉम, ऊर्जा, फार्मा आणि कृषिक्षेत्रावर कोरोनाचा कमी परिणाम होईल.ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया, इलेक्ट्रिकल्स, केमिकल्स आणि विमा या क्षेत्रावर माफक परिणाम होईल. टेलिकॉम, ऊर्जा, फार्मा आणि कृषी या क्षेत्रांना फारसा फटका बसणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.सध्याच्या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम झालेले म्हणून टेलिकॉम क्षेत्र उदयास येईल. या काळात जगभरात डेटा ट्रॅफिकमध्ये २० ते ३० टक्के वाढ झाली आहे. टेलिकॉम कंपन्यांच्यासबस्क्र ाइबरच्या वाढीत या काळात प्रचंड घसरण होण्याची शक्यता आहे. मात्र, सबस्क्राइबर्सकडून कंपनी बदलली जाण्याचं प्रमाणही कमी होईल.या कालखंडामध्ये विजेची मागणी २५०ते ३० टक्क्यांनी घसरली आहे. वापराचे प्रमाण आणि किमतीमध्ये घसरण झाली आहे. सप्टेंबर २०२० पर्यंत मागणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. मागणी आणि पुरवठ्यातील समतोल साधारण वर्षभराने सुरळीत होईल, असा अंदाज आहे.या काळामध्ये फार्मा क्षेत्रावर कमी परिणाम झाला आहे. चीनमधून होणारा कच्च्या मालाचा पुरवठाही सुरळीत झाला आहे. अहवालातील अंदाजानुसार आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या चौथ्या तिमाहीत या क्षेत्रात प्रचंड वाढ होईल. यंदा पावसाचा अंदाज चांगला असल्याने कृषिक्षेत्रावर सौम्य परिणाम होईल. शेतकऱ्यांसाठी रब्बीचा मोसम लाभदायक ठरेल.आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये जीडीपीमध्ये मोठी घसरण झाल्याने तसेच लॉकडाउनचा मागणी, पुरवठा साखळी आणि आर्थिक परिणाम पाहता आॅटो क्षेत्राला सावरण्यास २०२२ पर्यंत वाट पहावी लागेल. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सिमेंट क्षेत्रात दोन आकडी घसरण होण्याची चिन्हे आहेत. अनेक सिमेंट कंपन्यांनी नुकतीच क्षमतावृद्धी केलेली असली तरी त्यांचा ताळेबंद बºया स्थितीत आहे.याआधीच्या मंदीच्या काळात जे घडले त्याउलट आताच्या मंदीमध्ये आयटी क्षेत्रात मागणी आणि पुरवठा अशा दोन्हीवर परिणाम होत आहे. आयटीमधील ३० टक्के खर्च रद्दच केले जातील वा पुढे ढकलले जातील. चौथ्या तिमाहीत अनेक आयटी कंपन्यांच्या महसूलवाढीवर कमी परिणाम जाणवेल.रिटेल विक्री घटणार- नजीकच्या काळात फिजिकल डिस्टन्सिंगमुळे रिटेल क्षेत्राला जबरदस्त फटका बसणार आहे. रिटेल व्यवसायांमध्ये सर्वाधिक परिणाम कपड्यांच्या व्यवसायावर होईल. त्यापाठोपाठ फूड रिटेलर (रेस्तराँ)वर परिणाम होईल. वाणसामानाच्या दुकानांना याची सर्वात कमी झळ बसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. टेक्सटाइल कंपन्यांचे बहुतांश ग्राहक रिटेलर्स आहेत. त्यामुळे इतर कंपन्यांनाही मागणी घटल्याचा फटका बसू शकतो.बॅकांवर येणार ताणबँकिंग आणि एनबीएफसी क्षेत्रावर मंदावलेल्या प्रगतीमुळे अधिक ताण येणार आहे. बँकिंग क्षेत्र हे उत्तम अर्थव्यवस्थेचे द्योतक मानले जाते. कर्जांची घटलेली मागणी, कर्ज बुडण्याचे वाढलेले प्रकार तसेच नोटाबंदी, जीएसटीनंतर काहीशा तणावातच असणाºया कॉर्पोरेट क्षेत्राकडून वसुली होण्यातील विलंब यामुळे बॅँकिंग क्षेत्र चिंतेत आहे.
CoronaVirus News : १५ क्षेत्रांना बसू शकतो मोठा फटका; डीएसपी एमएफच्या नव्या अहवालातील निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:02 AM