CoronaVirus News : राजभवनाचे १६ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानं महापालिका खडबडून जागी, तातडीनं राबवल्या उपाययोजना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 01:39 PM2020-07-12T13:39:38+5:302020-07-12T13:45:00+5:30
थे कार्यरत एका इलेक्ट्रिकल शाखा अभियंत्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी झाली.
मुंबई : राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाला असून, चाचणीचा अहवाल प्राप्त झालेल्या ४० कर्मचाऱ्यांपैकी १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानुसार १०० जणांची चाचणी झालेली आहे. या चाचणीत १४ जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पूर्वीचे २ आणि आताचे १४ असे एकूण सध्या १६ जण तेथे बाधित (positive) आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी, तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. इथे कार्यरत एका इलेक्ट्रिकल शाखा अभियंत्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी झाली.
आता सर्व कर्मचा-यांच्या कुटुंबीयांचीसुद्धा कोरोना चाचणी होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं उपाययोजना राबवल्या आहेत. राजभवन येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "डी" विभाग कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.
Maharashtra: Sanitisation work being carried out in the premises of Raj Bhavan (Governor's residence) in Mumbai, after at least 18 people tested #COVID19 positive. pic.twitter.com/IuDyXKswiH
— ANI (@ANI) July 12, 2020
महापालिकेनं अशा राबवल्या उपाययोजना
• मुंबईत वाळकेश्वर स्थित राजभवन येथे काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित दोन रुग्ण आढळून आले होते. या कारणाने महानगरपालिकेने राजभवन वरील अधिकारी/कर्मचारी यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे सुचवले होते.
• त्यानुसार १०० जणांची चाचणी झालेली आहे. या चाचणीत १४ जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. पूर्वीचे २ आणि आताचे १४ असे एकूण सध्या १६ जण तेथे बाधित (positive) आहेत.
• राजभवन येथील कर्मचारी निवासस्थानी अलगीकरण (quarantine) सोयीस्कर असल्यास त्यांना तेथेच त्यांच्या व्यवस्थेनुसार अलगीकरण करण्यात येणार आहे.
• तथापि राजभवन येथील प्रशासनाने जर महानगरपालिकेकडे अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या, तर तेथील कर्मचाऱ्यांचे अलगीकरण महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या केंद्रांमध्ये त्वरित केले जाणार आहे.
• महापालिकेच्या डी विभाग कार्यालयाकडून राजभवन येथे निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही वेळोवेळी केली आहे. यासाठी स्वतंत्र कर्मचारी तेथे नेमण्यात आले आहेत.
• राजभवन येथे डॉक्टर्स व तत्सम कर्मचारी आहेत. तथापि आवश्यक वाटल्यास महापालिकेचे डॉक्टर्स व इतर कर्मचारी ही मदतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
हेही वाचा
...म्हणून येत्या २ महिन्यांत सोन्याचे भाव आणखी भडकणार; ही असू शकतात 'कारणं'
CoronaVirus News : पुनश्च 'होम'! 'या' प्रश्नांची उत्तरे मिळणार का?
भारताकडून पहिल्यांदाच मालाबार युद्धाभ्यासाचं ऑस्ट्रेलियाला आमंत्रण; चीन भडकला
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी चक्क रिक्षातून आणला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह
...म्हणून अशानं दोन देशांमधले सगळेच प्रश्न सुटत नसतात, शरद पवारांचा मोदींना सल्लावजा टोला
CRPFनं काढली बंपर भरती; बेरोजगारांना नोकरीची संधी; 1.42 लाखांपर्यंत मिळणार पगार