Join us

CoronaVirus News:  राज्यात दिवसभरात 2949 कोरोनाबाधितांची नोंद; रिकव्हरी रेट 93.54 टक्क्यांवर

By मुकेश चव्हाण | Published: December 14, 2020 8:25 PM

राज्यात आतापर्यंत  48 हजार 269 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 2949 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 60 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 72383 पर्यत खाली आला आहे. तसेच आज  4610 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत  48 हजार 269 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 17,61,615 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 93.54 टक्क्यांवर पोहचला आहे. 

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 17 लाख 48 हजार 362 चाचण्यांपैकी 18 लाख 83 हजार 365 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 4 हजार 406 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, 4 हजार 335 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

देशात जानेवारीपासून लसीकरण?; सिरमच्या अदार पुनावालांनी दिले मोठे संकेत

कोरोना लसीकरणावरून देशवासियांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी लसीकरणावर मोठे संकेते दिले आहेत. डिसेंबरच्या शेवटी कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. 

अदार पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की, या महिन्याच्या शेवटी एसआयआयला कोरोना लसीचे लायसन मिळू शकते. मात्र, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी २०२१ पासून भारतात  कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची अॅस्ट्राझिनेकासोबत मिळून ही लस विकसित करत आहे. 

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या