CoronaVirus News: गेल्या 24 तासांत 3940 कोरोनाबाधितांची नोंद; रुग्णांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ
By मुकेश चव्हाण | Published: December 19, 2020 08:44 PM2020-12-19T20:44:03+5:302020-12-19T20:57:06+5:30
राज्यात आतापर्यंत 48 हजार 648 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 3940 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 74 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 61095 झाली आहे. तसेच आज 3119 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आतापर्यंत 48 हजार 648 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 18,92,707 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.14 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे महाराष्ट्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल करू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक असणार आहे.
Maharashtra reported 3,940 new #COVID19 cases, 3,119 discharges, and 74 deaths today, as per State Health Department
— ANI (@ANI) December 19, 2020
Total cases: 18,92,707
Total recoveries: 17,81,841
Death toll: 48,648
Total active cases: 61,095 pic.twitter.com/anWUQs2vla
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 20 लाख 59 हजार 235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 18 लाख 92 हजार 707 (15.7 टक्के ) नमुने करोनासाठी पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 360 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर 4 हजार 20 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात आज 3940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3119 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1781841 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 61095 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.14% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 19, 2020
देशात जानेवारीपासून लसीकरण?; सिरमच्या अदार पुनावालांनी दिले मोठे संकेत-
कोरोना लसीकरणावरून देशवासियांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड यूनिवर्सिटीसोबत मिळून कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी लसीकरणावर मोठे संकेते दिले आहेत. डिसेंबरच्या शेवटी कोरोना लसीच्या आपत्कालीन लसीकरणाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.
अदार पुनावाला यांनी एका ग्लोबल बिझनेस समिटला संबोधित करताना ही माहिती दिली. आम्हाला आशा आहे की, या महिन्याच्या शेवटी एसआयआयला कोरोना लसीचे लायसन मिळू शकते. मात्र, त्याच्या वापराची मंजुरी नंतर मिळेल. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर जानेवारी 2021 पासून भारतात कोरोना लसीकरण अभियान सुरु केले जाईल. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ब्रिटनची अॅस्ट्राझिनेकासोबत मिळून ही लस विकसित करत आहे.