CoronaVirus News : राज्यात दिवसभरात ४२२ कोरोनाबाधितांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 04:46 AM2020-08-19T04:46:50+5:302020-08-19T04:47:10+5:30
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ असून बळींचा आकडा २० हजार ६८७ इतका झाला आहे.
मुंबई : राज्यात दिवसभरात ४२२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ११ हजार ११९ कोरोनाबाधितांची नोंद झाली. चिंताजनक म्हणजे मागील काही दिवसांत नोंद झालेले हे कोरोना बळींचे दिवसभरातील हे सर्वाधिक प्रमाण आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ असून बळींचा आकडा २० हजार ६८७ इतका झाला आहे. तर १ लाख ५६ हजार ६०८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी ९ हजार ५३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के असून मृत्युदर ३.३६ टक्के आहे. राज्यात दिवसभरात नोंद झालेल्या ४२२ मृत्यूंमध्ये पुण्यात सर्वाधिक बळींची नोंद झाली. कोरोनामुळे झालेल्या ४२२ बळींमध्ये मुंबई ४९, ठाणे ४, ठाणे मनपा १८, नवी मुंबई मनपा ८, कल्याण-डोंबिवली मनपा १०, उल्हासनगर मनपा ५, भिवंडी-निजामपूर मनपा २, मीरा-भार्इंदर मनपा २, वसई-विरार मनपा ३, रायगड २५, पनवेल मनपा ३६, नाशिक ११, नाशिक मनपा ५, पुणे १६, पुणे मनपा ५४, पिंपरी-चिंचवड मनपा १९ आदी रुग्णांचा समावेश आहे.