CoronaVirus News : राज्यात ४,३७,८७० जण कोविडमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 05:39 AM2020-08-19T05:39:29+5:302020-08-19T05:39:53+5:30

राज्यात मंगळवारी ९ हजार ५३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण कोविडमुक्त झाले. बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के आहे.

CoronaVirus News : 4,37,870 people in the state are free from covid | CoronaVirus News : राज्यात ४,३७,८७० जण कोविडमुक्त

CoronaVirus News : राज्यात ४,३७,८७० जण कोविडमुक्त

Next

मुंबई : राज्यात दिवसभरात ११ हजार ११९ कोरोना बाधितांची नोंद झाली असून ४२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांत नोंद झालेले हे कोरोना बळींचे दिवसभरातील हे सर्वाधिक प्रमाण आहे. राज्यातील रुग्णांची संख्या ६ लाख १५ हजार ४७७ असून बळींचा आकडा २० हजार ६८७ इतका झाला आहे. तर १ लाख ५६ हजार ६०८ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात मंगळवारी ९ हजार ५३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४ लाख ३७ हजार ८७० रुग्ण कोविडमुक्त झाले. बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के आहे.
>देशात बरे होण्याचे प्रमाण ७३.१८ टक्क्यांवर
गेल्या २४ तासात देशात ५५ हजार ७९ नव्या कोरोनाबाधितांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या २७ लाखांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली की, गेल्या २४ तासात देशात ८७६ जणांचा बळी गेल्याने एकूण मृतांचा संख्या ५१ हजार ७९७ इतकी झाली आहे. देशात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या २७ लाख २ हजार ७४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढून ७३.१८ टक्के झाले आहे, हीच बाब दिलासादायक आहे. आतापर्यंत देशात एकूण १९ लाख ७७ हजार ७७९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.
>नवनीत राणा पुन्हा पॉझिटिव्ह
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याने राणा दाम्पत्यांना दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

Web Title: CoronaVirus News : 4,37,870 people in the state are free from covid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.