CoronaVirus News: राज्यात आज ५५३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; १८९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 10:28 PM2020-07-01T22:28:33+5:302020-07-01T22:47:45+5:30

राज्यात आजपर्यंत एकूण ९३,१४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

CoronaVirus News: 5537 new corona patients registered in the state today; 189 killed | CoronaVirus News: राज्यात आज ५५३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; १८९ जणांचा मृत्यू

CoronaVirus News: राज्यात आज ५५३७ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; १८९ जणांचा मृत्यू

Next

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यभरात आज ५५३७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,८०,२८९ वर गेली आहे. राज्यात आज १८९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत ८०५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज २२४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ९३,१५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५१.६७ % एवढे झाले आहे. मुंबईत आज ६९ रुग्णांचे मृत्यू झाले असून, मीरा- भाईंदर-२६, ठाणे मनपा-१७, कल्याण-डोंबिवली- ४, जळगाव-३, पुणे-३, नवी मुंबई-१, उल्हासनगर-१, भिवंडी- १, पालघर- १. वसई विरार-१, धुळे-१ आणि अकोला शहरात १ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ८,०५३ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


सध्या राज्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७९, ०७५ आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९,९२,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १,८०,२९८ (१८.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,०८,६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तत्पूर्वी, राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत आज आरोग्य विभागामार्फत शासन निर्णय जाहीर केला आहे.  अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल.

राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी त्यांची संख्या वाढविण्याकरीता जिल्ह्यांमध्ये रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून घेतानाचा गरज भासल्या, खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्ण वाहक वाहन म्हणून वापर करण्याचा निर्णय झाला आहे. 

Web Title: CoronaVirus News: 5537 new corona patients registered in the state today; 189 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.