मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात येत असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला असला तरी शुक्रवारी कोरोनामुळे ६२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद मुंबई महापालिकेच्या कोविड अहवालात करण्यात आली आहे. महापालिकेकडील माहितीनुसार, यातील ५५ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ४३ रुग्ण पुरुष आणि १९ रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २ जणांचे वय ४० वर्षांखाली होते. ३५ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित २५ रुग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते. विशेषत: मुंबई जिल्हयातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ७० टक्के आहे. ११ ते १६ जुलैपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.३४ टक्के आहे. १६ जुलै पर्यंत ४ लाख २१ हजार ३४५ चाचण्या झाल्या आहेत.
CoronaVirus News : मुंबईत ६२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, बरे झालेल्यांचा दर ७० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 2:48 AM