Join us

CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात आज नव्या 6364 कोराबाधितांची वाढ; 198 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 10:28 PM

आज राज्यभरातून 3515 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यभरात आज नव्या  6364 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,92,990 वर पोहचली आहे. राज्यात आज 198 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 8,376 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज राज्यभरातून 3515 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

राज्यात आज 198 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. यापैकी 150 मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत तर, उर्वरित 48 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. तर, सध्या राज्याचा मृत्यूदर 4.34 टक्के इतका आहे. आज नोंदवलेल्या मृत्यूंपैकी ठाणे मनपातील 23, सोलापूर मनपा- 10, पनवेल- 3, कल्याण डोंबिवली- 2, उल्हासनगर-2, भिवंडी-1, मीरा भाईंदर-1 वसई-विरार-1, रायगड-1, अहमदनगर-1, जळगाव-1, पिंपरी-चिंचवड-1 आणि अमरावती-1 यांचा समावेश आहे.

राज्यात कोरोनाच्या निदान चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आलं आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 10 लाख 49 हजार 277 नमुन्यांपैकी 1 लाख 92 हजार 990 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात 5 लाख 89 हजार 448 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, 42 हजार 371 लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबईमहाराष्ट्रराजेश टोपे