Join us

CoronaVirus News: राज्यात ९७ टक्के रुग्ण लक्षणेविरहित; मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 1:10 AM

१ लाख ३६ हजार जणांवर रुग्णालयात उपचार सुरू

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची सख्या साडेतीन लाखांच्या टप्प्यावर असून यात १ लाख ३६ हजार रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी ९७ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे व लक्षणेविरहित असल्याचे दिसून आले आहे. तर २ टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर असून १ टक्का रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, एकूण रुग्णसंख्येत पुरुषांचे प्रमाण महिला रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. राज्यातील कोरोनाबाधितांमध्ये ६१ टक्के पुरुष व ३९ टक्के महिला रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १७ लाख ४१ हजार ९९२ कोविडच्या चाचण्या झाल्या असून त्यातील ८० टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, तर २० टक्के प्रयोगशाळा नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाबाधितांच्या मृत्यूंमध्येही पुरुष रुग्णांचा आकडा अधिक आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूंमध्ये ६५ टक्के पुरुष व ३५ टक्के महिला आहेत. अतिजोखमीच्या आजारांमुळे आतापर्यंत राज्यात ७० टक्के रुग्णांचे मृत्यू झाले असून अन्य ३० टक्के मृत्यू अन्य कारणांमुळे झाले आहेत.

...त्यानंतर ठरते उपचारांची दिशा

डॉ. सागर जोशी यांनी सांगितले की, सध्या कोरोनाच्या लक्षणांमध्ये बदल होतो आहे. त्यामुळे लक्षणेविरहित असलेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. काही वेळा पहिल्या टप्प्यात या रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत, त्या वेळी यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येते. त्यानंतर सात दिवसांनंतरच्या काळात लक्षणे दिसू लागली किंवा प्रकृतीत सुधारणा न झाल्यास उपचारांची दिशा बदलण्यात येते.

12,591 बालकांना कोरोना राज्यात नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या १२ हजार ५९१ बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे.मागील काही दिवसांत बालकांना होणाऱ्या कोरोना (कोविड)च्या संसर्गात कमालीची वाढ झाली असून त्यात गुंतागुंतीच्या समस्याही दिसून आल्या आहेत. ११ ते २० वयोगटातील 22,345 मुला-मुलींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई