CoronaVirus News : अपर पोलीस महासंचालकांनाही झाली कोरोनाची बाधा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 04:19 AM2020-07-18T04:19:25+5:302020-07-18T04:20:31+5:30

गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाल्याने, त्यांच्या रिक्त पदाचा अतिरिक्त भारही चौबे यांच्या खांद्यावर आहे.

CoronaVirus News: Additional Director General of Police was also attacked by Corona | CoronaVirus News : अपर पोलीस महासंचालकांनाही झाली कोरोनाची बाधा

CoronaVirus News : अपर पोलीस महासंचालकांनाही झाली कोरोनाची बाधा

Next

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत कर्तव्य बजावत असताना, मुंबईचे कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख, अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या त्यांचा भार गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा यांच्याकड़े देण्यात आला आहे.            
 गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची केंद्रात प्रतिनियुक्ती झाल्याने, त्यांच्या रिक्त पदाचा अतिरिक्त भारही चौबे यांच्या खांद्यावर आहे. चौबे यांच्या पथकातील एकाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला होम क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर गुरूवारी चौबे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी केली. यात, चौबे यांच्यासह त्यांचे रीडर, पीएसह चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. चौबे यांच्या कार्यालयाशेजारी अन्य प्रमुख अधिकारी, मंत्रालयीन कर्मचारीही कार्यरत आहेत.  त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांनीही धसका घेतला आहे.         

- राज्यभरात मृत पोलिसांचा आकडा ८५ वर राज्यभरात कोरोनाचे संकट वाढत असताना, मृत पोलिसांचा आकडा ८५ वर गेला आहे. तर १३४४ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरु आहेत. यात, मुंबईतील सर्वाधिक पोलिसांचा समावेश आहे. मध्य प्रादेशिक विभागाचेअपर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू हे कोरोनावर मात करत नुकतेच पुन्हा आपल्या कर्तव्यावर रुजू झाले आहेत.

Web Title: CoronaVirus News: Additional Director General of Police was also attacked by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.