मुंबई : पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या देशांतर्गत विमानांत वृत्तपत्रांना परवानगी देण्यात यावी, अशी जोरदार मागणी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी केली आहे.
विजय दर्डा यांनी एक ट्विट करून ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले की, ह्यजागतिक आरोग्य संघटना तसेच माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर या दोघांनीही वृत्तपत्रे सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे. विशेष बाब म्हणजे, कोविड-१९ साथीचा उद्रेक झाल्यानंतर माध्यम उद्योगास जबर फटका असला आहे.
वृत्तपत्रे लोकांना तथ्यपूर्ण आणि विश्वसनीय माहिती पुरविणारे एकमेव माध्यम आहे, हे निर्विवादपणे सिद्ध झालेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही स्पष्टपणे नमूद केले आहे की, वृत्तपत्रांतून कोरोना विषाणू पसरत नाही. अनेक नामवंत डॉक्टर आणि वैज्ञानिक संस्था यांनीही याला दुजोरा दिला आहे.या पार्श्वभूमीवर नागरी उड्डयन मंत्रालयाने विमान प्रवाशांना प्रवासादरम्यान वृत्तपत्रांपासून वंचित ठेवणाऱ्या आपल्या मार्गदर्शक सूचनांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे, असे दर्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये सूचित केलेआहे.