CoronaVirus News: देवदूत ठरताहेत कोविड हेल्थ सेंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 02:10 AM2020-07-20T02:10:51+5:302020-07-20T02:11:31+5:30
धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ आॅक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे.
- सचिन लुंगसे, स्रेहा मोरे
मुंबई : मुंबई महापालिकेच्या २४ विभागांत आरोग्य स्वयंसेविका, स्थानिक स्वयंसेवक हे झोपड्यांत रोज घरोघरी दाखल होत सर्वेक्षण करत असून, या पथकांनी शोध घेतलेल्या व्यक्तींना दवाखाने, कोरोना काळजी केंद्रामध्ये दाखल केले जात असून, कोरोना रुग्णांना बरे करण्यात मुंबई महापालिकेच्या रुग्णालयासह कोविड सेंटरही मोलाची भूमिका बजावत आहेत. ज्या रुग्णांना मध्यम स्वरूपात कोरोनाबाधा किंवा इतर आजारांसह कोरोनाबाधा आहे. त्यांना डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल करता येऊ शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे. गेल्या काही महिन्यांत या सेंटरबाबत तक्रारी वाढत असल्या तरी पालिकेने त्या फेटाळल्या आहेत. उलटपक्षी सेंटरमुळे कोरोनाला हरविण्यात पालिकेला यश येत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यानाजवळ आॅक्सिजन सुविधायुक्त २०० खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत हे रुग्णालय उभे राहिल्यामुळे या भागातील रुग्णांना आहे तेथेच उपचारांची सुविधा मिळत असल्याचा दावा करण्यात आला. या रुग्णालयासाठी १० डॉक्टर्स, १५ नर्स, वॉर्डबॉय तसेच पूर्णवेळ रुग्णवाहिकासुद्धा उपलब्ध आहेत.
सीसीटीव्ही यंत्रणाही बसविण्यात आली आहे. थर्मल सेंसर यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. भायखळा येथील रिचर्डसन क्रूडास कंपनीच्या आवारातील सेंटरमध्ये एक हजार रुग्णांच्या उपचारांची सोय आहे. या कोविड सेंटरचे दोन भाग करण्यात आले असून, पहिल्या सेंटरमध्ये डेडिकेटेड हेल्थ सेंटरमध्ये ३०० रुग्णांसाठी आॅक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. आयसीयूची गरज नसणारे रुग्ण येथे उपचार घेऊ शकतात. दुसऱ्या सेंटरमध्ये कोणतीही लक्षणे नसणाºया सातशे रुग्णांच्या उपचारांची सोय आहे.
कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी मुलुंड येथे, दहिसर येथे, महालक्ष्मी रेसकोर्स येथे आणि बीकेसी येथील १२० खाटांचे आयसीयू अशा ३ हजार ५२० बेड्सच्या जम्बो सुविधा आहेत. मुलुंड, बीकेसी येथील कोरोना रुग्णालयांतील आयसीयू सुविधा कार्यान्वित आहेत. या ठिकाणच्या आयसीयू विभागात रुग्णांवर उपचार, देखभालीसाठी खासगी विशेषज्ञ, डॉक्टर्स, कर्मचारी यांची सेवा आहे.
मुलुंड येथे १६५० खाटांच्या कोरोना रुग्णालयात १००० खाटा आॅक्सिजन सोयींयुक्त असून ६५० खाटा विलगीकरणासाठी आहेत. या ठिकाणच्या ५०० खाटा ठाणे महापालिकेसाठी उपलब्ध आहेत. दहिसरमध्ये ९५५ खाटांचे रुग्णालय असून त्या ठिकाणी १०८ खाटांचे आयसीयू आहे. या रुग्णालयातील २०० खाटा मीरा-भार्इंदर महापालिकेला उपलब्ध आहेत. महालक्ष्मी रेसकोर्सवर ६०० खाटांची क्षमता असलेले कोरोना
उपचार केंद्र आहे.अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी काय म्हणाले?
1मुंबई महापालिका मुंबई शहर आणि उपनगरातील कोविड सेंटरमध्ये मेडिकल स्टँडर्डप्रमाणे सेवासुविधा दिल्या जात आहेत. वरळी येथील डोम कोविड सेंटरबाबत सांगायचे झाल्यास सर्वाधिक चांगल्या सुविधा तेथे आहेत. याचा अर्थ दुसºया कोविड सेंटरमध्ये सुविधा नाहीत असे नाही.
2येथे रुग्णांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतली जाते. रुग्ण सुरक्षित राहील, याची काळजी आम्ही घेतो. बीकेसीमध्ये ५० टक्के आॅक्सिजनयुक्त सिलिंडर बेड आहेत. ५० टक्के सर्वसाधारण बेड आहेत. येथेही आमच्याकडे कोणत्याही तक्रारी नाहीत. कोविड सेंटरमध्ये आॅक्सिजनची कमतरता आहे. बेड नाही. डॉक्टर लक्ष देत नाहीत. उपचार होत नाहीत, अशा तक्रारी नाहीत. कारण रुग्ण म्हणा किंवा संशयित रुग्ण म्हणा.
3आम्ही यांना केंद्रबिंदू ठेवूनच काम करत आहोत. सुविधा देत आहोत. प्रत्येक ठिकाणी या सेवासुविधा असून, याव्यतिरिक्त मनोरंजनही आहे. कारण हा आजार असा आहे की, याला सातत्याने वैद्यकीय गरज पडत नाही; जोवर माणूस एकदम क्रिटिकल होत नाही तोपर्यंत. कोविड सेंटरमध्ये टीव्ही आहे. वायफाय आहे. काही ठिकाणी योगा घेतला जातो. जेणेकरून रुग्णाला कंटाळा येत नाही.
4कोविड सेंटरवर अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही राबविले आहेत. आतापर्यंत आमच्याकडे एकही तक्रार अशी नाही की, कोविड सेंटरमध्ये डॉक्टर नाहीत. बेड नाहीत. कर्मचारी नाहीत. सुविधा नाहीत. दुसरे म्हणजे कोविड सेंटरचा आपला पहिला आणि दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे. दुसºया टप्प्यात सेवा आहेत. येथे रुग्ण मोठ्या संख्येने येतील, असे वाटले तर आपण तिसरा टप्पाही हाती घेऊ.
5मुळात शक्य झाले तर आपणास याची गरज पडू नये. कारण आपण मुंबईत बºयापैकी कोरोनावर नियंत्रण मिळवीत आहोत. त्यामुळे कोविड सेंटरच्या तिसºया टप्प्याची कामे सुरू करण्याची गरज पडू नये, असे आम्हाला वाटते. गरज पडली तर आपण तयारी ठेवली आहे. दरम्यान, वरळी डोम येथे आपण चार विभाग केले आहेत. येथे डॉक्टर आणि रुग्ण यांचा थेट संपर्क येणार नाही याची काळजी घेतो. संपर्क आला तर संसर्ग वाढण्याची शक्यता असते. कोविड योद्ध्यांची यंत्रणांबाबत नाराजी
कोरोनाच्या संकटात डॉक्टर, परिचारिका व चतुर्थ श्रेणी कामगार झटत आहेत. मात्र या कोविड योद्ध्यांना अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे. शहर-उपनगरातील ठिकठिकाणी काम करणाºया कोविड योद्धे असणाºया डॉक्टरांना अजूनही वेतन मिळालेले नाही. केरळमधून आलेल्या डॉक्टरांचीही स्थिती सारखीच आहे; त्यामुळे या डॉक्टरांनी राज्य व पालिका यंत्रणांबाबत नाराजी व्यक्त करत परतण्याचा निर्णय घेतला आहे.
दीड महिने सेवा दिली, मात्र पदरी निराशा
मागील दीड महिन्यांपासून केरळच्या डॉक्टर व परिचारिकांनी अहोरात्र मुंबईकरांसाठी सेवा दिली. मात्र पालिका व राज्य शासनाकडून पदरी निराशा आली. बराच काळ वेतन व अन्य सेवासुविधांसाठी पाठपुरावा केला. पण सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने आता केरळला परतण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आरोग्य यंत्रणेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, अद्ययावत यंत्रणा सुधारण्याची आत्यंतिक गरज आहे.
- डॉ. संतोष कुमार, केरळच्या डॉक्टरांचे प्रमुख पथक
समस्यांचा विळखा जैसे थे
कुटुंबाचा उदरनिर्वाह माझ्यावर अवलंबून आहे, मागील दोन महिन्यांचा पगार अजून आलेला नाही. इतकेच नव्हे तर पालिकेकडून नियुक्तीचे पत्रही मिळालेले नाही. आताच्या कठीण परिस्थितीत नोकरी सोडू शकत नाही, त्यामुळे रुग्णसेवा सुरू आहे. कोविड विभागात काम करताना तिथेही सोयीसुविधांचा अभाव आहे. मुलुंड येथे पालिकेने निवासाची सोय केलीय, मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ७० रुपयांहून अधिक शुल्क लागते. सुरुवातील वसतिगृहात खाण्या-पिण्याची सोय पालिका प्रशासनाने केली. शासकीय अध्यादेशात प्रवासी भत्ता देण्याची तरतूद असूनही शासनाकडून आम्हाला तो देण्यात येत नाही, वरिष्ठ डॉक्टरांना मात्र सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. या काळात आम्ही आरोग्याचा धोका पत्करला आहे, मात्र मानसिकदृष्ट्याही कठीण काळ आहे, त्यामुळे आमचा विचार शासनाने प्राधान्याने करायला हवा.
- डॉ. प्रिया (कोविड योद्धा)
कोरोनाच्या संकटातही करावी लागताहेत आंदोलन
कोरोनाच्या काळात चतुर्थ श्रेणी कामगार जीवाची पर्वा न करता अविरत काम करत आहेत. मात्र सुरुवातीपासून सर्व बाबतीत या कामगारांना आपल्या हक्कांसाठी झटावे लागत आहे. निकृष्ट पीपीई किट्स, सफाईचा प्रश्न, प्रलंबित वेतनवाढ, कोरोनाचा संसर्ग झाल्यास मिळणारे उपचार, कुटुंबीयांना मिळणारी मदत अशा छोट्या छोट्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नुकतेच आयÞुक्तांनी पालिका रुग्णालयातील सर्व कामगार, कर्मचारी व अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करून इतर कर्मचाºयांना सवलत दिल्यामुळेही आंदोलन करावे लागले. त्यानंतर आयुक्तांनी हे परिपत्रक मागे घेतले आणि बायोमेट्रिक हजेरी बंद केली.
- प्रदीप नारकर, म्युनिसिपल मजदूर युनियन, चिटणीस