Join us

CoronaVirus News: विमानतळावरील कर्मचाऱ्यांची तिकडेच निवासाची व्यवस्था करा, भाजपा आमदाराची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 2:59 PM

सदर कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, असंही आमदार पराग अळवणी म्हणाले आहेत.

मुंबईः विमानतळ येथे काम करणाऱ्या व कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांची विमानतळाच्या आत निवासाची व्यवस्था करा, अशीही मागणी भाजपा आमदारानं महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ परिसर माझ्या मतदारसंघात येतो हे आपल्याला माहितीच आहे. सदर परिसरातील कोरोना बाधितांपैकी अनेक रुग्ण हे विमानतळ येथे कर्तव्य बजावत होते, असे लक्षात येते. विशेषतः आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू असताना व त्यानंतर कार्गो सुरू असल्यामुळे अनेक कर्मचारी कर्तव्यासाठी विमानतळाच्या आत असतात व प्रवाशांच्या संपर्कात येतात. तसेच सध्याच्या काळात  अडचण लक्षात घेता विमानतळ परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कामावर बोलावले जात आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, असंही आमदार पराग अळवणी म्हणाले आहेत.तसेच परिसरातील अनेक वस्त्या या अतिशय दाटीवाटीच्या असल्याने सदर ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीस कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती म्हणजे संपूर्ण परिसरात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, अशीही माहिती विलेपार्लेतील भाजपाचे आमदार पराग अळवणी यांनी दिली आहे. आजच्या परिस्थितीतही सदर कर्मचारी आपली जबाबदारी ओळखून काम करीत आहे हे प्रशंसनीय असून अशा सर्वांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः आजपासून परदेशात अडकलेल्या व्यक्तींना आणण्यासाठी विमानसेवा सुरू होत असून, पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांचा धोका वाढत आहे. त्यामुळे त्यांची व्यवस्था विमानतळावरच करा, अशी मागणीच पराग अळवणींनी केली आहे. तसेच आमदार  पराग अळवणींनी महापालिका आयुक्तांकडे काही सूचनाही केल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितते बाबत विमानतळाचे ऑपरेशन्स संभाळत असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कडून घेतली जात आहे अथवा नाही याची खातरजमा करण्यात यावी; तसेच सदर काळात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची विमानतळ परिसरताच रहाण्याची व्यवस्था करावी; त्याच प्रमाणे कर्मचाऱ्यांची प्रतिकारशक्ती जपण्यासाठी त्यांच्या कामाच्या वेळा तसेच जेवण व औषधांची सुयोग्य व्यवस्था सुद्धा करण्यात यावी, असंही ते म्हणाले आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

झोपेत होते लोक अन् 5000 टनांच्या दोन टँकमधून झाली गॅसगळती; जाणून घ्या कारण

भारत पाकिस्तानविरोधात पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करणार?; इम्रान खान यांना वाटतेय भीती

दुबईच्या धर्तीवर भारतातल्या विमानतळांचा होणार कायापालट; दिसणार असं चित्र

CoronaViurs: 'त्या' व्हायरल फोटोंवरून दिग्विजय सिंह अन् मुलावर ज्योतिरादित्य शिंदेंचा पलटवार

Coronavirus: आम्ही कोणत्याही युद्धासाठी तयार; चिनी सैन्याची अमेरिकेला थेट धमकी

Coronavirus: जगाची भारताकडे नजर; बुद्धांनी सांगितलेल्या चार मार्गांवरून देशाची वाटचाल- नरेंद्र मोदी

Coronavirus: कोरोना विषाणूवर मोठं संशोधन; पण खुलासा करण्याआधीच चिनी वैज्ञानिकाची गोळ्या घालून हत्या

CoronaVirus News: कोरोनाची लस जगाला देणार का?; भारताचा उल्लेख करुन इस्रायलचं लय भारी उत्तर

पाकिस्तानातून राजस्थानमार्गे भारतात येतंय नवं संकट; शेतकऱ्यांना सतावतेय चिंता

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस