CoronaVirus News : रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनचा आधार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:27 AM2020-07-16T04:27:35+5:302020-07-16T06:13:50+5:30

पुण्यातील एका अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरची गरज होती. एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील एका औषध विक्रेत्याकडे रुग्णाचे नातेवाईक संजय मोहिते (नाव बदलले आहे) यांना हे इंजेक्शन उपलब्ध झाले.

CoronaVirus News: The basis of doctor's prescription on the black market of Remdesivir? | CoronaVirus News : रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनचा आधार?

CoronaVirus News : रेमडेसिवीरच्या काळ्याबाजाराला डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनचा आधार?

Next

मुंबई : अतिगंभीर रुग्णांसाठी किमान ४ ते ७ रेमडेसिवीर इंजेक्शन आणण्याची चिठ्ठी (प्रीस्क्रिप्शन) डॉक्टरांकडून दिली जाते. गेल्या काही दिवसांपासून औषध उपलब्ध करून देणारे विक्रेते या प्रीस्क्रिप्शनची मूळ प्रत स्वत:कडे ठेवतात. मात्र, स्टॉक कमी असल्याचे सांगत रुग्णाच्या नातेवाइकांच्या हाती एक किंवा दोनच इंजेक्शन दिली जातात. मात्र, याच प्रीस्क्रिप्शनच्या आधारे औषध कंपन्यांकडून इंजेक्शनचा पूर्ण कोटा मिळवून त्याची काळ्याबाजारात विक्री होत असल्याचा संशय बळावला आहे.
पुण्यातील एका अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरची गरज होती. एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील एका औषध विक्रेत्याकडे रुग्णाचे नातेवाईक संजय मोहिते (नाव बदलले आहे) यांना हे इंजेक्शन उपलब्ध झाले. डॉक्टरांनी चिठ्ठीवर सात इंजेक्शन लिहून दिली होती. मात्र, विक्रेत्याने मोहितेंना केवळ दोन इंजेक्शन दिली. रुग्णाच्या आधार कार्डची फोटो कॉपी, डॉक्टरांची मूळ चिठ्ठी आणि औषधांची विनंती करणारे ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया यांच्या नावाचे पत्रही या विक्रेत्याने घेतले. उर्वरित इंजेक्शन जर स्टॉक आला तरच उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले. त्यानंतर मोहिते यांनी दुसºया एका विक्रेत्याला विचारले. मात्र, तिथे दाखविण्यासाठी मूळ प्रीस्क्रिप्शन मोहिते यांच्याकडे नव्हते. ते पुण्यातील डॉक्टरांकडून पुन्हा घ्यावे लागले. केवळ मोहितेच नव्हेतर, अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना असे अनुभव येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना पहिल्या दिवशी रेमडेसिवीरच्या दोन इंजेक्शनचा डोस आणि नंतर पाच दिवस प्रत्येकी एक इंजेक्शन द्यावे लागते. ठाण्यातील एका प्रथितयश रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका व्यक्तीच्या आईला पहिली दोन इंजेक्शन याच पद्धतीने मिळाली. मात्र, उर्वरित इंजेक्शन मिळविताना ते अक्षरश: रडकुंडीला आले होते. अशा प्रकारांमुळे उपचारांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे इथल्या डॉक्टरांनी सांगितले. कोणत्या रुग्णाला किती इंजेक्शन दिली याचा रेकॉर्ड औषधे उपलब्ध करून दिलेल्या विक्रेत्यांना ठेवावा लागतो. परंतु, प्रीस्क्रिप्शनपेक्षा कमी इंजेक्शन देत उर्वरित इंजेक्शन काळ्याबाजारात विकली जात असावीत असा काही औषध विक्रेत्यांचाच संशय आहे. पोलीस या रॅकेटच्या मागावर असल्याचे समजते. काळाबाजार थांबविण्यासाठी ठरावीक रिटेल औषध विक्रेत्यांच्या माध्यमातून विक्री न करता कोविड रुग्णालयांमध्ये तिथल्या रुग्णांच्या गरजेनुसार औषधे उपलब्ध करून द्यावीत, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण तरी थांबेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

हेल्पलाइन कुचकामी
हेट्रो आणि सिप्ला या कंपन्यांनी अधिकृत विक्रेत्यांची नावे आणि फोन नंबर दिले असले तरी तिथे औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. सिप्ला कंपनीच्या हेल्पलाइनवर फोन केल्यास याच विक्रेत्यांचे नंबर दिले जातात. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी हेट्रो कंपनीला ई मेल केल्यानंतरच आम्ही केवळ रुग्णालयांनाच थेट औषधांचा पुरवठा करतो. कृपया रुग्णालयांमार्फत मेल करा. त्यानंतर आम्ही पुढील कार्यवाही करू, असे उत्तर देण्यात आले.

Web Title: CoronaVirus News: The basis of doctor's prescription on the black market of Remdesivir?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.