मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार (वय ५७) यांचे कोरोनामुळे मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात् पत्नी, दोन मुले, सून तसेच एक भाऊ, दोन बहिणी व मोठा आप्त परिवार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील २४ प्रशासकीय विभागांपैकी एच/पूर्व या विभागात कोरोना रुग्ण वाढ दुप्पट होण्याचा कालावधी १३४ दिवसांवर पोहोचलेला आहे आणि येथील रूग्ण वाढीचा सरासरी दरही ०.५ % आहे. अशी कामगिरी करणारा हा पहिला विभाग ठरला होता. म्हणजेच रुग्णांची वाढ ही अत्यंत कमी करण्यात यश आले होते. या प्रयत्नांमध्ये खैरनार यांचा मोठा वाटा होता.
धुळे महानगरपालिका हद्दीतील मोहाडीचे मूळ रहिवासी असलेले खैरनार यांचे शालेय शिक्षण मोहाडीमध्येच झाले होते. विद्युत शाखेतील पदविका शिक्षण त्यांनी धुळे शहरातील शासकीय तंत्रनिकेतन येथून पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबईतील व्ही. जे. टी. आय. महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीय पदवी आणि 'आय. आय. टी. पवई' या संस्थेतून त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केली होती. खैरनार हे फेब्रुवारी १९८८ पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. जानेवारी २०१८ पासून ते सहाय्यक आयुक्तपदी कार्यरत होते. 'जी उत्तर' विभागाचे सहाय्यक आयुक्त असताना, महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलेल्या विशेष कामगिरीचा गौरव म्हणून अशोक खैरनार यांना तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते 'जानेवारी २०१९' साठी 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने विशेष सन्मानित करण्यात आले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली
मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक
अमेरिका की आशिया, 'विश्वयुद्ध 2020' भडकल्यास कोण भिडतील? तज्ज्ञांनी लावले अंदाज
Ganeshotsav 2020 : यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करणार? सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
राजस्थानमध्ये घोडेबाजार, संकटात गेहलोत सरकार?; भाजपाच्या दोन नेत्यांना अटक
चीननेच कोरोनाची माहिती लपविली, WHO ही साथीला! आरोप करणाऱ्या महिला सायंटिस्टचे पलायन
परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार