CoronaVirus News: ...म्हणून राज्यात लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारने सांगितले कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 08:45 PM2020-06-29T20:45:53+5:302020-06-29T20:46:08+5:30

राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे काही नियम लादणे आवश्यक आहे.

CoronaVirus News: Citizens do not follow the rules laid down by the state government, said Health Minister Rajesh Tope | CoronaVirus News: ...म्हणून राज्यात लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारने सांगितले कारण

CoronaVirus News: ...म्हणून राज्यात लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारने सांगितले कारण

Next

मुंबई: मुंबई: राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे अजूनही काही लोकं पालन करत नाही. काही अत्यावश्यक कामं नसतानाही लोकं घराबाहेर फिरत असताना दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने ३१ जुलैपर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. 

राज्यभरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे काही नियम लादणे आवश्यक आहे. मात्र सरकार अनलॉक करण्याचाच प्रयत्न करत आहेत. आता फारसे निर्बंध नाहीत. मात्र कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी काही गोष्टी करणे गरजेचं असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. मात्र, लॉकडाउन सुरुच राहणार आहे. त्यानंतर, सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे. 

Web Title: CoronaVirus News: Citizens do not follow the rules laid down by the state government, said Health Minister Rajesh Tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.