Join us

CoronaVirus News: दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचले 92.88% वर

By मुकेश चव्हाण | Published: December 05, 2020 9:34 PM

राज्यात आतापर्यंत  47 हजार 659 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत नव्या 4922 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून आज 94 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 82849 वर पोहचली आहे. तसेच आज 5834 जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्यात आतापर्यंत  47 हजार 659 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 1715884 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.88% झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 12 लाख 05 हजार 118 प्रयोगशाळा चाचण्यांपैकी 18 लाख 47 हजार 509 चाचण्या पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 60 हजार 685 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये तर 5 हजार 855 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान, दिवाळीनंतर राज्यासह मुंबईत कोरोनाचा धोका वाढेल, अशी शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र समाधानकारक बाब म्हणजे, तज्ज्ञांनी वर्तविलेल्या निरीक्षणानुसार राज्यासह मुंबईची रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणात तितकीशी वाढ झाली नसल्याचे समोर आले. आता टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, राज्यातील तापमानात घट झाल्यास शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते. यापूर्वी मे, जून आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता वाढली होती.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई