CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा होतोय कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:22 PM2020-08-31T20:22:07+5:302020-08-31T20:32:40+5:30
मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा कमी होत असल्याचे चित्र आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई: वांद्रे पूर्व्- पश्चिम ते दहिसर पूर्व-पश्चिम पर्यंत विस्तीर्ण पसरलेल्या पश्चिम उपनगरात गेल्या एप्रिल, मे व जून मध्ये कोरोनाचा विळखा होता. मुंबई महानगर पालिकेचे तत्कालिन आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडून विद्यमान आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर चेस द व्हायरस मोहिम प्रभावीपणे राबवली.कोरोना रुग्णांना वेळेवर हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध होण्यासाठी मुंबईतील 24 वॉर्डमध्ये 24×7 हेल्पलाईन सुरू केली. कोरोना रुग्ण शोध मोहिम प्रभावीपणे राबवण्यासाठी अँटीजेन टेस्ट आणि स्वॅब टेस्ट प्रणाली सुरू केली आणि अनेक धडाकेबाज निर्णय घेतले. त्यामुळे मुंबई सह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा कमी होत असल्याचे चित्र आहे.
पश्चिम उपनगराची लोकसंख्या सुमारे 60 लाखांच्या आसपास असून यामध्ये एच पूर्व, एच पश्चिम, के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य व आर उत्तर असे एकूण 9 वॉर्ड येतात. एच पूर्व वॉर्ड मध्ये वांद्रे पूर्व कलानगरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री खाजगी निवासस्थान असून परिवहन मंत्री अँड.अनिल परब यांचे वांद्रे पूर्व गांधीनगर येथील खाजगी निवासस्थान या वॉर्ड मध्ये मोडते.त्यामुळे या वॉर्डला एक वेगळे महत्व आहे.
पालिका प्रशासनाने दि,22 ऑगस्ट ते दि,29 ऑगस्टच्या कोरोनाच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार एच पूर्व वॉर्ड मध्ये दि,22 रोजी कोरोनाचे 4607 रुग्ण होते, दि,29 रोजी कोरोनाचे 4776 रुग्ण होते,तर आतापर्यंत 3885 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले. कोरोनाचा दुपटीचा कालावधी हा 135 दिवसांवर पोहचला आहे.
एच पश्चिम वॉर्डमध्ये दि,22 रोजी कोरोनाचे 3752 रुग्ण होते, दि,29 रोजी कोरोनाचे 4102 रुग्ण होते,तर आतापर्यंत 3234 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले.कोरोनाचा दुपटीचा कालावधी 54 दिवसांवर पोहचला आहे.
के पूर्व वॉर्ड मध्ये दि,22 रोजी कोरोनाचे रुग्ण 8341 होते, दि,29 रोजी 8681 वर पोहचला आहे.तर आतापर्यंत 7282 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनाचा दुपटीचा कालावधी हा 121 दिवसांवर पोहचला आहे.
के पश्चिम वॉर्ड दि,22 रोजी 7539 कोरोनाचे रुग्ण होते, दि,29 रोजी 8017 कोरोनाचे रुग्ण होते,तर आतापर्यंत 6599 रुग्ण कोरोनामुक्त झाले.कोरोनाचा दुपटीचा कालावधी हा 79 दिवसांवर पोहचला आहे.
पी दक्षिण वॉर्ड मध्ये दि,22 रोजी कोरोनाचे 4507 रुग्ण होते,दि,29 रोजी कोरोनाचे 4850 रुग्ण होते,तर आतापर्यंत 3856 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या दुपटीचा कालावधी हा 66 दिवसांवर पोहचला आहे.
पी उत्तर वॉर्ड मध्ये दि,22 रोजी कोरोनाचे 8030 रुग्ण होते, दि,29 रोजी कोरोनाचे 8539 रुग्ण होते,तर आतापर्यंत 7330 रुग्ण कोरोनामुक्त झाले.कोरोनाच्या दुपटीचा वेग हा 88 दिवसांवर पोहचला आहे.
आर दक्षिण वॉर्ड मध्ये दि,22 रोजी 6473 कोरोनाचे रुग्ण होते, दि,29 रोजी कोरोनाचे 7064 रुग्ण होते,तर आतापर्यंत 5648 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या दुपटीचा वेग हा 56 दिवसांवर पोहचला आहे.
आर मध्य वॉर्ड मध्ये दि,22 रोजी दि,22 रोजी कोरोनाचे 7381 रुग्ण होते, दि,29 रोजी कोरोनाचे 8110 रुग्ण होते,आतापर्यंत 6160 रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनाच्या दुपटीचा दर हा 48 दिवसांवर पोहचला आहे.
आर उत्तर वॉर्ड मध्ये दि,22 रोजी कोरोना रुग्ण 3524 होते, दि,29 रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही 3883 होती,आतापर्यंत 3002 रुग्ण कोरोना मुक्त झाले.कोरोना दुपटीचा दर हा 58 दिवसांवर पोहचला आहे.
याबाबत शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद, आमदार व माजी महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले की,मुंबईसह पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा कमी होण्याचे श्रेय हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपनगर पालक मंत्री आदित्य ठाकरे व पालिका प्रशासनाला जाते. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत कठोर भूमिका घेतली. सातत्याने पालिका आयुक्त,अतिरिक्त आयुक्त,सहाय्यक आयुक्तांबरोबर बैठका घेऊन त्यांना सूचना केल्या आणि प्रशासनाने त्यांची अंमलबजावणी केली. मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधी व नगरसेवकांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. महापालिका प्रशासनाने कोरोना टेस्टिंगमध्ये वाढ करून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या. त्यामुळे पश्चिम उपनगरात कोरोनाचा विळखा कमी होत असल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले.