CoronaVirus News : सात विभाग झालेत कोरोनाचे हॉटस्पॉट, मुंबई महापालिकेला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 06:39 AM2020-07-15T06:39:38+5:302020-07-15T06:39:58+5:30

मुंबईत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ९३ हजार ८९४ वर पोहोचली आहे. यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार ९८९ आहे. तर ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

CoronaVirus News: Corona hotspot becomes seven divisions, Mumbai Municipal Corporation is worried | CoronaVirus News : सात विभाग झालेत कोरोनाचे हॉटस्पॉट, मुंबई महापालिकेला चिंता

CoronaVirus News : सात विभाग झालेत कोरोनाचे हॉटस्पॉट, मुंबई महापालिकेला चिंता

Next

मुंबई : कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ५२ दिवसांवर पोहोचला आहे. तर २४ प्रशासकीय विभागांपैकी १७ विभागांमध्ये दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर दीड टक्क्यांपेक्षा कमी आहे. मात्र अद्यापही भुलेश्वर, मलबार हिल, मुुलुंड, मालाड, कांदिवली, बोरीवली आणि दहिसर या विभागांत रुग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता या विभागांवर लक्ष केंद्रित केले आहे.
मुंबईत आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ९३ हजार ८९४ वर पोहोचली आहे. यापैकी सक्रिय रुग्णांची संख्या २१ हजार ९८९ आहे. तर ७० टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच रुग्णसंख्येतील दैनंदिन वाढ १.३४ टक्के आहे. मुंबई शहर भागातील हॉटस्पॉट कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असताना पश्चिम उपनगरातील मालाड ते दहिसरमध्ये रुग्णसंख्या अधिक दिसून येत होती. त्यामुळे पालिकेने येथे ‘मिशन झिरो’ ही मोहीम सुरू केली आहे. याचे चांगले परिणाम आता या पट्ट्यात दिसून येत आहेत.
मालाड ते दहिसर या परिसरात जास्तीत जास्त लोकांची चाचणी करण्यासाठी मोबाइल व्हॅन सेवा सुरू करण्यात आली आहे. तसेच झटपट निदान करणाऱ्या अँटिजन चाचणीचा वापर केला जात आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांमध्ये येथील रुग्णसंख्या आता नियंत्रणात येत आहे. मात्र अद्यापही पश्चिम येथील दहिसर आणि पूर्व उपनगरातील मुलुंड येथे रुग्णसंख्या सरासरीपेक्षा अधिक आहे. तसेच भुलेश्वर आणि मलबार हिल येथील इमारतींमध्येही रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. 

कर्मचाऱ्यांना लागण
- मलबार हिल परिसरातील उत्तुंग इमारतींमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या इमारतींमध्ये काम करणारे सुरक्षारक्षक, घरकाम करणाºया महिला आणि काही कर्मचाºयांमध्ये कोरोनाची लागण दिसून येत आहे.
- मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील दोन टोक असलेल्या मुलुंड आणि दहिसर विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. मात्र ठाण्यातील काही रुग्ण मुलुंड येथील रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत आहेत. तर मीरारोड, भार्इंदर, वसई, विरारचे काही रुग्ण दहिसरच्या रुग्णालयात उपचारांसाठी येत असल्याचा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.
- एच पूर्व विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून तब्बल १६४ झाला आहे. तर रुग्णवाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता ०.४० टक्के असा सर्वात कमी आहे.
- मालाड ते दहिसर या परिसरात जास्तीत जास्त लोकांची चाचणी करण्यासाठी मोबाइल व्हॅन सेवा सुरू केली आहे.

Web Title: CoronaVirus News: Corona hotspot becomes seven divisions, Mumbai Municipal Corporation is worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.