CoronaVirus News : 'राजगृह'ची तोडफोड करणाऱ्या दोघा आरोपींना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 12:29 PM2020-07-31T12:29:05+5:302020-07-31T12:59:32+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड केली होती. त्यावेळी दगडफेकीत राजगृहाच्या काचांचेही नुकसान झाले.

CoronaVirus News: Corona infection in two accused of vandalism Dr. Babasaheb Ambedkar's Mumbai House 'Rajgruha' | CoronaVirus News : 'राजगृह'ची तोडफोड करणाऱ्या दोघा आरोपींना कोरोनाची लागण

CoronaVirus News : 'राजगृह'ची तोडफोड करणाऱ्या दोघा आरोपींना कोरोनाची लागण

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची विशाल मोरे आणि उमेश जाधव या दोघांनी तोडफोड केली होती.या दोघांच्या अटकेनंतर त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले.

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सध्या या आरोपींना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची विशाल मोरे आणि उमेश जाधव या दोघांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी विशाल मोरेला ८ जुलै रोजी तर उमेश जाधवला २२ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. 

एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले याबाबत की, या दोन्ही आरोपींना कोरोनाची लागण झाली असावी असा आमचा अंदाज होता. त्यांची चौकशी करणाऱ्या पथकाला आम्ही खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच, या दोघांच्या अटकेनंतर त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले असता त्यांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आम्ही त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पाठवले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  याशिवाय, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाचीही कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र, या पथकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच, माटुंगा पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांना करोनाची लागण झाली होती. मात्र, लगेच उपचार झाल्यानंतर ते कोरोनामुक्त झाल्याचेही या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दादर येथील राजगृह निवासस्थानाची या दोन्ही आरोपींनी तोडफोड केली होती. त्यावेळी दगडफेकीत राजगृहाच्या काचांचेही नुकसान झाले. सीसीटीव्ही कॅमेरे फोडून दगडफेक करून हल्लेखोरांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच माटुंगा पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. तसेच, तोडफोड केल्याप्रकरणी भीमराव यशवंतराव आंबेडकर (६०) यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

आणखी बातम्या...

गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास दहा हजारांचा दंड, युपी सरकारकडून आदेश जारी    

मंत्र्यांची कोरोनावर मात, पण स्वागतावेळी कार्यकर्त्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा    

कोरोनामुक्त झालात, मग प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्या; डोनाल्ड ट्रम्प यांचे आवाहन    

 

Web Title: CoronaVirus News: Corona infection in two accused of vandalism Dr. Babasaheb Ambedkar's Mumbai House 'Rajgruha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.