CoronaVirus News: मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाचा वेग मंदावतोय; नीरज हातेकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 03:44 AM2020-05-28T03:44:01+5:302020-05-28T06:32:51+5:30

दाट वस्त्या, पायाभूत सुविधांची वानवा हे रुग्णसंख्या वाढण्याचे मुख्य कारण

CoronaVirus News: Corona in Maharashtra including Mumbai is slowing down; Neeraj Hatekar's claim | CoronaVirus News: मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाचा वेग मंदावतोय; नीरज हातेकर यांचा दावा

CoronaVirus News: मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोनाचा वेग मंदावतोय; नीरज हातेकर यांचा दावा

googlenewsNext

- सीमा महांगडे 
 

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबई आणि महाराष्ट्रात कमी होण्याची चिन्हे आहेत. कोरोनाचा आलेख मुंबई आणि महाराष्ट्रात समांतर रेषेत आल्याचा दावा मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर यांनी नव्या अहवालातून केला आहे.
मुंबईतील दाट वस्त्या, तिथे नसलेल्या पायाभूत सुविधा हे मुंबईत मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या रुग्णसंख्येचे कारण असल्याचे त्यांनी अहवालात नमूद केले. मुंबईसारख्या शहरात योग्य व सुनियोजित गृहनिर्माण धोरणाची आवश्यकता त्यांनी यातून मांडली आहे.

अहवालासाठी २ महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर व त्यांच्या सहायिका प्राध्यापिका पल्लवी बेल्हेकर यांनी देश-विदेशातील कोरोना प्रभावित भागांचा अभ्यास केला. भारतातील राज्यांची कोरोनाबाधितांची उपलब्ध संख्या, अभ्यास यावरून मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाचा वेग मंदावल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला. वेग मंदावला असला तरी वाढलेली चाचणींची संख्या, मोठी असलेली लोकसंख्या यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसत आहे.

शहरातील ४२ % लोकसंख्या ही शहराच्या ९.५% भागात झोपडीत राहत आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणी फिझिकल डिस्टंसिन्गचे नियम पाळणे अवघड असल्याने रुग्णसंख्येचा वेग अधिक असून विषाणूचा प्रसार झपाट्याने होत असल्याची महिती प्राध्यापक हातेकर यांनी दिली.

‘सुनियोजित गृहनिर्माण धोरण हवे’

शहराच्या आर्थिक विकासासाठी हातभार लावणाºया गरिबांसाठी सुनियोजित गृहनिर्माण धोरणांची आखणी करणे गरजेचे असल्याचे मत प्रा. हातेकर यांनी मांडले. मुंबई, महाराष्ट्रातील परिस्थिती बरीच नियंत्रणात असून आसाम, ओडिशा, हिमाचल प्रदेशची चिंता वाढली आहे. कारण लॉकडाउननंतरही लोकसंख्या कमी असूनही तेथे रुग्णसंख्या कमी झाली नसल्याचा निष्कर्ष त्यांनी मांडला.

Web Title: CoronaVirus News: Corona in Maharashtra including Mumbai is slowing down; Neeraj Hatekar's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.