मुंबई : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल थेट महापालिकेकडे पाठवण्याचे आदेश खाजगी प्रयोग शाळांना दिले आहेत. रुग्णांना अहवाल आणि रुग्णालयात खाट आवश्यकतेनुसार महापालिकाच उपलब्ध करून देणार आहे. मात्र चाचणी अहवाल मिळणे हा रुग्णाचा हक्क आहे, असे मत व्यक्त करीत विरोधी पक्षांनी आयुक्तांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्णाबरोबरच महापालिकेला याबाबत कळविण्यात येत होते. मात्र अहवाल मिळाल्यानंतर निर्माण होणारा गोंधळ टाळण्यासाठी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पुन्हा नियमात बदल केले आहेत.मात्र या निर्णयावर मनसेने आक्षेप घेतला आहे. आपल्याला कोरोना झाल्याची माहिती मिळणे हा रुग्णाचा हक्क आहे. त्याचा रिपोर्ट त्प्रयोग शाळेतून थेट महापालिकेकडे गेला आणि दोन दिवस पालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नाही, या दरम्यान रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर त्यास पालिका जबाबादार असेल असे मत त्यांनी व्यक्त केले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही आपला अहवाल कळणे हा रुग्णाचा अधिकार असल्याचे मत व्यक्त केले.
CoronaVirus News: ‘कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला अहवाल मिळायलाच हवा’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:52 AM