Join us

CoronaVirus News : काय म्हणता? कोरोना चाचणी अहवाल मिळणार अर्ध्या तासात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 5:42 AM

लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर हळूहळू कामकाज सुरू करताना संसर्गाला आळा घालण्यासाठी ही उपाययोजना आखण्यात येत आहे.

मुंबई : उत्तर मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘मिशन झीरो’ जाहीर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेने ‘मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग’ची घोषणा केली आहे. त्यानुसार कोरोना चाचणी अहवाल अवघ्या अर्ध्या तासात देणाऱ्या अँटिजेन टेस्टिंगच्या एक लाख किट खरेदी करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार रॅपिड टेस्टिंग किट खरेदी करून आपल्या कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याची सूचना कॉर्पोरेट हाउसेस, खासगी कंपन्यांकडून करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर हळूहळू कामकाज सुरू करताना संसर्गाला आळा घालण्यासाठी ही उपाययोजना आखण्यात येत आहे.मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त, संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, साहाय्यक आयुक्त तसेच विविध वैद्यकीय प्रयोगशाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मंगळवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शासनमान्य एक लाख अँटिजेन किट लवकरच उपलब्ध होतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. हे किट पालिकेची सर्व रुग्णालये, शासकीय रुग्णालये तसेच कोरोना उपचार केंद्रे आदी ठिकाणी उपयोगात येणार आहेत. यातून लक्षणे दिसत असलेल्या संशयितांची तातडीने चाचणी करून संसर्गाला रोखण्याची उपाययोजना अतिशय वेगवान होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.हाय रिस्क गटाची तत्काळ चाचणीभारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या निर्देशानुसार अतिजोखीम (हाय रिस्क) गटातील व्यक्तींची ५ ते १० दिवसांमध्ये चाचणी करण्यात येते. अशा व्यक्तींच्या प्रतिदिन सुमारे दोन हजार अतिरिक्त चाचण्या आता केल्या जाणार आहेत. यामुळे अशा सुमारे साडेसहा हजार चाचण्या आता शक्य होतील. तसेच हाय रिस्क गटातील व्यक्ती घरी अलगीकरणात असल्यास, त्यांना आता कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेतून चाचणी करून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरिकांची घरीच चाचणी७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायदेखील कोणत्याही वैद्यकीय प्रयोगशाळेकडून कोरोना चाचणी करून घेता येणार आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत असलेल्या कोणत्याही एका मदतनीसाला आवश्यक असल्यास चाचणी करून घेण्याचा पर्याय खुला असणार आहे. तर, डॉक्टरांकडून फिजिकल प्रिस्क्रिप्शनऐवजी ई-प्रिस्क्रिप्शन मिळाले तरी त्याच्या आधारे नागरिकांच्या घरी जाऊन प्रयोगशाळांना चाचणी करून घेता येईल, असे निर्देशही आयुक्त चहल यांनी दिले आहेत.खासगी कंपन्या, कॉर्पोरेट हाउसेसना सूचनाशासनमान्य रॅपिड टेस्टिंग किट खासगी कंपन्या, कॉर्पोरेट हाउसेस यांनी खरेदी करून आपल्या कर्मचाºयांच्या चाचण्या करून घ्याव्यात, अशी सूचना पालिका प्रशासनाने केली आहे. तसेच मुंबईतील ३५ मोठ्या खासगी रुग्णालयांनीदेखील या अँटिजेन टेस्ट किट खरेदी करून त्याचा उपयोग करावा, अशी सूचना पालिकेने केली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना सकारात्मक बातम्या