CoronaVirus News : कोरोनाचा ट्रेंड झोपडपट्टीकडून गृहनिर्माण सोसायट्यांकडे, मुंबईतील संक्रमण आले आटोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 01:49 AM2020-06-25T01:49:02+5:302020-06-25T01:49:20+5:30

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे आणि मास्कचा वापर नेहमी करावा असे आवाहन पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी केले आहे.

CoronaVirus News : Corona's trend From slums to housing societies, transition from Mumbai to Atoka | CoronaVirus News : कोरोनाचा ट्रेंड झोपडपट्टीकडून गृहनिर्माण सोसायट्यांकडे, मुंबईतील संक्रमण आले आटोक्यात

CoronaVirus News : कोरोनाचा ट्रेंड झोपडपट्टीकडून गृहनिर्माण सोसायट्यांकडे, मुंबईतील संक्रमण आले आटोक्यात

Next

मुंबई : राज्यात पुन:श्च हरिओम या टप्प्यात मुंबईतील कोरोना संक्रमण नियंत्रणात येत आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढीचा ट्रेंड आता बदलत असून तो मुंबईतील झोपडपट्ट्या सोडून अनेक उंच इमारती ,हाऊसिंग सोसायट्या आणि संकुलांमध्ये कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. हा बदल लक्षात घेऊन मुंबईकरांनी परिस्थिती नियंत्रणात आली तरी बेजबाबदारीने वागू नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे आणि मास्कचा वापर नेहमी करावा असे आवाहन पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढीस लागल्यापासून, राज्यातील, मुंबईतील आणि जगातील रुग्णसंख्या वाढीचा वेग, त्यांचा परिणाम आणि अंदाज नीरज हातेकर अभ्यास करत आहेत. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती देताना मुंबईतील डबलिंग पिरियड म्हणजे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ वाढत असून तो सध्या २६.११ दिवसांवर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा डबलिंग पिरियड खूपच समाधानकारक असल्याचे ते म्हणाले. हा डबलिंग पिरियड काढण्यासाठी ते एका विशिष्ट शास्त्रीय पद्धतीचा वापर करत असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या डबलिंग पिरियडपेक्षा तो कमी असला तरी मुंबईतला डबलिंग पिरियड वाढतो आहे.
हा डबलिंग पिरियड असाच राहणे किंवा वाढणे यासाठी आपण जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या लॉकडाऊनपेक्षा बऱ्याच प्रमाणात शिथिलता मिळाली असली तरी कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही त्यामुळे तो अजून वाढेल याला आपण कारणीभूत ठरायला नको असे त्यांनी आवर्जून सांगितले. डबलिंग पिरियडप्रमाणेच रिप्रॉडक्शन नंबरही कमी होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. एक बाधित व्यक्ती आपल्या सहवासातील सरासरी किती लोकांना बाधित करते याचा अंदाज. मुंबईत या आरचा नंबर सातत्याने कमी होत आहे. हा आर जितका कमी तितका कोरोनाचा फैलावावर ताबा येतोय असे म्हणता येईल. ३ दिवसांपूर्वी मुंबईतील आर हा १.१७ होता, तर २२ जूनला तो १.१४ इतका खाली घसरला आहे. तो १ च्या खाली न्यायचा असल्याचे ते म्हणाले.
>रुग्णसंख्या वाढीचा वेग, त्यांचा परिणाम आणि अंदाज नीरज हातेकर अभ्यास करत आहेत. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती देताना मुंबईतील डबलिंग पिरियड म्हणजे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा काळ वाढत असून तो सध्या २६.११ दिवसांवर असल्याची माहिती त्यांनी दिली. हा डबलिंग पिरियड खूपच समाधानकारक असल्याचे ते म्हणाले.

Web Title: CoronaVirus News : Corona's trend From slums to housing societies, transition from Mumbai to Atoka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.