CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:05 AM2020-09-18T03:05:50+5:302020-09-18T06:31:14+5:30

केंद्र सरकारकडून मिळालेल्या संमतीनंतर आता केईएम रुग्णालय प्रशासनाने या लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे.

CoronaVirus News: Covishield vaccine test at KEM Hospital from tomorrow | CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी

CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी

Next

मुंबई : भारतीय औषध महानियंत्रकांनी (ड्रग कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया) मुंबईतील परळच्या केईएम रुग्णालयाला कोविशिल्ड लसीची चाचणी सुरू करण्यास सांगितले आहे. यापूर्वी, यूकेमध्ये आॅक्स्फर्डच्या या लसीचा एका रुग्णावर दुष्परिणाम झाल्यामुळे चाचणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्रुटी दूर झाल्यानंतर शनिवारपासून ही चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारकडून मिळालेल्या संमतीनंतर आता केईएम रुग्णालय प्रशासनाने या लसीच्या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. या चाचण्या झाल्यानंतर रुग्णालयातील एथिक कमिटीची परवानगी घेऊन लसीची चाचणी सुरू करण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयाच्या एथिक कमिटीमध्ये डॉ. पद्मा मेनन यांचा समावेश आहे. त्यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) लसीच्या चाचणीत सहभागी होणाऱ्या व्यक्तींच्या विम्याकरिता निवेदन दिले होते. नायर रुग्णालयातही लवकरच सर्व बाबींची पूर्तता करून लसीची चाचणी सुरू करण्यात येईल. आतापर्यंत या चाचणीसाठी १०० व्यक्तींनी नोंदणी केल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याविषयी सांगितले, चाचणीसंदर्भात आता मात्र सर्व पातळ्यांवर पूर्तता झाली असून केंद्राकडून चाचणी सुरू करण्याचे निर्देशही मिळाल्याने शनिवारपासून चाचणी सुरू होईल.

सहभागींसाठी
आरोग्य विमा
कोरोनासाठीच्या कोविशिल्ड या लसीच्या चाचणीत सहभागी होणाºया व्यक्तींचे दोन प्रकारचे आरोग्य विमा काढण्यात आले आहेत. त्यात १६० व्यक्तींचा १० कोटींचा समूह विमा आहे. तसेच, सहभागी व्यक्तींच्या औषधांच्या बिलांसाठी प्रत्येक व्यक्तीचा ३५ लाख रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. लसीच्या चाचणीदरम्यान या व्यक्तींवर काही दुष्परिणाम झाल्यास या विम्याचा लाभ मिळेल. केईएममध्ये ३५० पेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केली आहे. चाचणीच्या सुरुवातीच्या प्रक्रियेत या व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. त्यानंतर चाचणीदरम्यान चार महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकाला तीन डोस देण्यात येतील.
- डॉ. हेमंत देशमुख,
अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Web Title: CoronaVirus News: Covishield vaccine test at KEM Hospital from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.