CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्क्यांवर; १८ लाख २४ हजार ९३४ जणांची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:39 AM2020-12-31T00:39:27+5:302020-12-31T06:56:46+5:30

सध्या ५३,०६६ सक्रिय रुग्ण आहेत.

CoronaVirus News: The cure rate of Corona virus in the state is 94.62 percent | CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्क्यांवर; १८ लाख २४ हजार ९३४ जणांची कोरोनावर मात

CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्क्यांवर; १८ लाख २४ हजार ९३४ जणांची कोरोनावर मात

Next

मुंबई : राज्यात बुधवारी काेराेनाचे ४ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत १८ लाख २४ हजार ९३४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळानंतर वर्षाच्या अखेरीस दैनंदिन रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६२ टक्के झाले असून, मृत्युदर २.५६ टक्के आहे.

सध्या ५३,०६६ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी दिवसभरात ३,५३७ रुग्ण आणि ७० मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या १९ लाख २८ हजार ६०३ झाली असून मृतांचा आकडा ४९,४६३ झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ८० हजार ६८२ व्यक्ती घरगुती तर ३ हजार १२७ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
 

Web Title: CoronaVirus News: The cure rate of Corona virus in the state is 94.62 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.