CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर; दिवसभरात ५,७१४ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 02:30 AM2020-07-25T02:30:40+5:302020-07-25T06:37:57+5:30

१ लाख ४३ हजार रुग्णांवर उपचार सुरू

CoronaVirus News: The cure rate in the state is 56 per cent; 5,714 coronas released during the day | CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर; दिवसभरात ५,७१४ जण कोरोनामुक्त

CoronaVirus News: राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर; दिवसभरात ५,७१४ जण कोरोनामुक्त

Next

मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ५,७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यंत एकूण १ लाख ९९ हजार ९६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या ९,६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४३ हजार ७१४ रुग्णांवर (अ‍ॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. आतापर्यंत कोरोनापाठविलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाइन असून ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे २७८ मृत्यू झाल्याची नोंद झाली असून सध्या मृत्युदर ३.६८ टक्के आहे.

एकूण मृत्यूंपैकी मुंबई ५४, ठाणे ४, ठाणे मनपा ७, नवी मुंबई मनपा १०, कल्याण-डोंबिवली मनपा १३, उल्हासनगर मनपा ४, भिवंडी-निजामपूर मनपा २, मीरा-भार्इंदर मनपा १६, वसई-विरार मनपा ४, पालघर २, रायगड १०, पनवेल मनपा ४,
नाशिक १, नाशिक मनपा १०, अहमदनगर २, अहमदनगर मनपा १, धुळे १, जळगाव ९, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे ८, पुणे मनपा ४९, पिंपरी-चिंचवड मनपा १७, सोलापूर ५, सोलापूर मनपा ४, सातारा ३, कोल्हापूर ४, कोल्हापूर मनपा ३, रत्नागिरी २, औरंगाबाद १, औरंगाबाद मनपा ४, जालना ३, हिंगोली १, परभणी २, परभणी मनपा १, लातूर मनपा २, उस्मानाबाद ३, बीड २, नांदेड ३, नांदेड मनपा १, यवतमाळ १, नागपूर मनपा २, तर इतर राज्य १ अशी मृत्यूंची नोंद आहे.

एकूण ३ लाख ५७ हजार बाधित रुग्ण

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असले तरी आतापर्यंत कोरोना झालेल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या ३ लाख ५७ हजार ११७ एवढी आहे. तर कोरोनाची लागण झाल्यामुळे १३,१३२ जणांना जीव गमवावा लागला आहे.

Web Title: CoronaVirus News: The cure rate in the state is 56 per cent; 5,714 coronas released during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.