मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने स्थानिक पातळीवर घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
राज्याच्या काही जिल्ह्यांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार १ मार्च २०२१ पासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षकांची सुरक्षितता राज्य सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे. ज्या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे; तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.