Join us

CoronaVirus News : "केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 1:49 PM

राज्य सरकार अंग चोरून काम करतंय, असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं आहे. 

मुंबईः भाजपानं आज ठाकरे सरकारविरोधात 'महाराष्ट्र वाचवा' आंदोलन पुकारलं असून, मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने ४६८ कोटी दिले, याशिवाय १६०० कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. केंद्राने २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरून काम करतंय, असं टीकास्त्रही फडणवीसांनी सोडलं आहे. राज्य सरकार आणि मंत्री आभासी जगात जगत आहेत, सोशल मीडियावर पेड गँग तयार करून आणि काहींना प्रवक्ता करून सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय, पण ग्राऊंड लेव्हलला परिस्थिती वेगळी आहे, रुग्णांना उपचार मिळत नाहीत, रस्त्यावर फिरावं लागतं, सरकारी रुग्णालयात जागा नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशातील २० टक्के कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने समोर येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.खासगी रुग्णालयात सामान्यांना उपचार घेणे परवडत नाही, देशात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण ४ टक्के, महाराष्ट्रात १२.५ तर मुंबईत १३.५ टक्के आहे. महाराष्ट्रात, मुंबईत कोरोनाचा मोठा फैलाव झाला आहे. सर्व महानगरात कोरोनाचा कहर असून, राज्य सरकारची अद्यापही कोणतीही तयारी नाही, BKC ला सेंटर उभं केलंय, पण ते दोन दिवसात भरून जाईल आणि पाऊस पडला तर या सेंटरचं काय होईल?, सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.  

हेही वाचा

CoronaVirus News : शेतकरी संघटनेने मूठभर कापूस जाळून केला शासनाचा निषेध

CoronaVirus News :चार दिवस करा काम अन् तीन दिवस आराम, पंतप्रधानांनी कंपन्यांना सुचवला 'उपाय'

VIDEO: गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक आला सिंहांचा कळप अन्...

CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार  

जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी

CoronaVirus News : केंद्राला घेरण्यासाठी सोनियांनी विरोधकांची बोलावली बैठक, सपा, बसपा अन् आपनं ठेवले अंतर

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसदेवेंद्र फडणवीस