मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळत आहे. जागरुक मुंबईकर आणि पालिकेने यासाठी केलेल्या उपाययाेेजना उपयोगी ठरत आहेत. त्यामुळेच मुंबईत सुरुवातीला केवळ ८ दिवसांत रुग्ण दुप्पट होण्याचा असलेला कालावधी आता तब्बल २०८ दिवसांवर पोहोचला आहे.चेस द व्हायरस, मिशन झीरो, ट्रेसिंग-ट्रॅकिंग-टेस्टिंग-ट्रीटिंग या चतु:सूत्रीनुसार करण्यात येत असलेली कार्यवाही, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या भेटी, नागरिकांची पडताळणी, पोलिसांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधविषयक बाबी आणि मुंबई महापालिकेने केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.२० ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा मुंबईने रुग्ण दुपटीच्या कालावधीचा १०० दिवसांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला १५७ दिवसांचा टप्पा ओलांडला. पालिकेच्या २४ विभागांपैकी ४ विभागांनी ३०० दिवसांचा, ११ विभागांनी २०० दिवसांचा, ६ विभागांनी १७५ दिवसांचा तर उर्वरित ३ विभागांनीही १५० दिवसांचा टप्पा ओलांडलेला.
विभागनिहाय कालावधी- ३०० दिवसांपेक्षा जास्त ४ विभाग(जी उत्तर ३५१ दिवस, एफ दक्षिण ३१६ दिवस, ए ३०८ दिवस, सी ३०६ दिवस)- २०० दिवसांपेक्षा जास्त ११ विभाग (जी दक्षिण २८३ दिवस, एल २४५ दिवस, ई २४२ दिवस, एस २३८ दिवस, डी २३३ दिवस, एफ उत्तर २१३ दिवस, एम पूर्व आणि के पूर्व २०७ दिवस, एच पश्चिम २०६ दिवस, एच पूर्व २०३ दिवस आणि के पश्चिम २०० दिवस)
असे ओलांडले टप्पे१०० दिवस - २० ऑक्टोबर१२६ दिवस - २४ ऑक्टोबर१५० दिवस - २९ ऑक्टोबर२०८ दिवस - ५ नोव्हेंबर