CoronaVirus News: कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 01:16 AM2020-06-14T01:16:28+5:302020-06-14T06:50:11+5:30

हॉटस्पॉट विभागांमध्ये रुग्णसंख्या कमी होतेय; उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम

CoronaVirus News doubling rate of Corona patient reaches 26 days | CoronaVirus News: कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर

CoronaVirus News: कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर

googlenewsNext

मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण मुंबईत आता २६ दिवसांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भायखळा, धारावी, सायन-वडाळा आणि गोवंडी-मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. गोवंडी-मानखुर्दमध्ये तर ५२ दिवसांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे समोर आले आहे. 

मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी राज्य सरकारने आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने ‘चेसिंग द व्हायरस’ ही मोहीम सुरू केली होती. या उपाययोजनांचे चांगले परिणाम आता मुंबई शहरभर दिसून येत आहेत.
देशात कोरोना रुग्णांची संख्या १६ दिवसांत दुप्पट होत आहे. १० जून रोजी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २४.५ दिवसांवर पोहोचले होते. तर शनिवारी हे प्रमाण २६ दिवसांवर पोहोचले आहे.

या विभागांची बेस्ट कामगिरी
कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, गोवंडी, वडाळा हे हॉटस्पॉट बनले होते. या विभागांमध्ये रुग्ण दुपट्ट होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे या विभागांमध्ये जास्तीत जास्त लोकांची तपासणी, संशयितांना होम क्वारंटाइन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाºया गोळ्यांचे वितरण सुरू करण्यात आले. यामुळे गोवंडी-मानखुर्दमध्ये ५२ दिवस, सायन-वडाळामध्ये ५१ दिवस धारावीमध्ये ४८ दिवस तर वांद्रे पूर्व येथे रुग्णसंख्या ४३ दिवसांनी दुप्पट होत आहे.

दैनंदिन रुग्णवाढ कमी
विभाग टक्के
ए (कुलाबा, चर्चगेट) १.२
जी उत्तर (धारावी, माहीम) १.४
एफ उत्तर (सायन, वडाळा) १.४
एच पूर्व (सांताक्रुझ, खार, वांद्रे) १.५
इ (भायखळा, नागपाडा) १.६

दैनंदिन रुग्णवाढ जास्त
विभाग टक्के
आर उत्तर(दहिसर) ६.५
आर/दक्षिण(कांदिवली) ४.८
आर मध्य बोरीवली ४.७
पी उत्तर (मालाड) ४.५

यामुळे कोरोना नियंत्रणात : पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेच्या माध्यमातून अनेक बदल घडवून आणले. यात एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांना क्वारंटाइन करणे, रुग्णांवर दर्जेदार उपचार, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. मुंबईतील सरासरी रुग्ण दररोज वाढण्याचे प्रमाण २.७६ टक्के आहे.

Web Title: CoronaVirus News doubling rate of Corona patient reaches 26 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.