Join us

CoronaVirus News: कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी २६ दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 1:16 AM

हॉटस्पॉट विभागांमध्ये रुग्णसंख्या कमी होतेय; उपाययोजनांचा अपेक्षित परिणाम

मुंबई : कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण मुंबईत आता २६ दिवसांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भायखळा, धारावी, सायन-वडाळा आणि गोवंडी-मानखुर्द या विभागांमध्ये रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. गोवंडी-मानखुर्दमध्ये तर ५२ दिवसांनी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचे समोर आले आहे. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण २० दिवसांवर आणण्यासाठी राज्य सरकारने आठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. तसेच गेल्या महिन्यात पालिका प्रशासनाने ‘चेसिंग द व्हायरस’ ही मोहीम सुरू केली होती. या उपाययोजनांचे चांगले परिणाम आता मुंबई शहरभर दिसून येत आहेत.देशात कोरोना रुग्णांची संख्या १६ दिवसांत दुप्पट होत आहे. १० जून रोजी मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण २४.५ दिवसांवर पोहोचले होते. तर शनिवारी हे प्रमाण २६ दिवसांवर पोहोचले आहे.या विभागांची बेस्ट कामगिरीकोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून वरळी, धारावी, भायखळा, गोवंडी, वडाळा हे हॉटस्पॉट बनले होते. या विभागांमध्ये रुग्ण दुपट्ट होण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे या विभागांमध्ये जास्तीत जास्त लोकांची तपासणी, संशयितांना होम क्वारंटाइन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाºया गोळ्यांचे वितरण सुरू करण्यात आले. यामुळे गोवंडी-मानखुर्दमध्ये ५२ दिवस, सायन-वडाळामध्ये ५१ दिवस धारावीमध्ये ४८ दिवस तर वांद्रे पूर्व येथे रुग्णसंख्या ४३ दिवसांनी दुप्पट होत आहे.दैनंदिन रुग्णवाढ कमीविभाग टक्केए (कुलाबा, चर्चगेट) १.२जी उत्तर (धारावी, माहीम) १.४एफ उत्तर (सायन, वडाळा) १.४एच पूर्व (सांताक्रुझ, खार, वांद्रे) १.५इ (भायखळा, नागपाडा) १.६दैनंदिन रुग्णवाढ जास्तविभाग टक्केआर उत्तर(दहिसर) ६.५आर/दक्षिण(कांदिवली) ४.८आर मध्य बोरीवली ४.७पी उत्तर (मालाड) ४.५यामुळे कोरोना नियंत्रणात : पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ‘चेसिंग द व्हायरस’ या मोहिमेच्या माध्यमातून अनेक बदल घडवून आणले. यात एका पॉझिटिव्ह रुग्णामागे १५ जणांना क्वारंटाइन करणे, रुग्णांवर दर्जेदार उपचार, योगा थेरपी, सकस आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या उपचारांमुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. मुंबईतील सरासरी रुग्ण दररोज वाढण्याचे प्रमाण २.७६ टक्के आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या